Breaking News :
  • Home
  • Top News
  • मुलांच्या नाश्त्याची चिंता संपली! ट्राय करा ‘ही’ मेथी थेपला रेसिपी
फूड

मुलांच्या नाश्त्याची चिंता संपली! ट्राय करा ‘ही’ मेथी थेपला रेसिपी

Healthy Methi Thepla Recipe

Healthy Methi Thepla Recipe: रोज पोहे-उपमा खाऊन मुलांना कंटाळा आला असेल, तर आज नाश्त्यात पौष्टिक आणि चविष्ट मेथी थेपला बनवून पाहा. हा पदार्थ झटपट तयार होतो आणि मुलांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. जाणून घ्या त्याची सोपी रेसिपी.

रोज सकाळी मुलांच्या नाश्त्यासाठी (Kids Breakfast) काय बनवायचे, हा प्रत्येक पालकांसमोरचा प्रश्न असतो. रोज पोहे, उपमा किंवा इडली खाऊन मुलांनाही कंटाळा येतो. अशावेळी चवदार, पौष्टिक आणि पटकन तयार होणारा मेथी थेपला हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मेथीतील लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात, तर गव्हाच्या पिठामुळे त्यांना आवश्यक ऊर्जा मिळते. चला तर मग, मुलांना आवडेल अशी मऊ आणि स्वादिष्ट मेथी थेपल्याची सोपी रेसिपी (Methi Thepla Recipe) जाणून घेऊया.

हेही वाचा: ‘गुंगी गुडिया’चा राजकीय बॉम्ब! मुंबईत राष्ट्रवादीचा काँग्रेस कार्यालयात राडा

साहित्य (Easy Breakfast Recipe)

2 कप गव्हाचे पीठ
1 कप बारीक चिरलेली ताजी मेथी
1 टीस्पून हळद
1 टीस्पून लाल तिखट (मुलांसाठी कमी)
1 टीस्पून धने-जिरे पूड
½ टीस्पून ओवा
चिमूटभर हिंग
चवीनुसार मीठ
2 टीस्पून दही (ऐच्छिक)
1 टीस्पून तेल
आवश्यकतेनुसार पाणी

कृती (Healthy Methi Thepla Recipe)

सर्वप्रथम मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. एका भांड्यात गव्हाचे पीठ, मेथी, हळद, धने-जिरे पूड, ओवा, हिंग, मीठ आणि थोडे तेल घालून एकत्र करा. हवे असल्यास दही घालून मऊसर पीठ मळून घ्या. 10 मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर लहान गोळे करून पोळीसारखे लाटा. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी हलके तेल किंवा तूप लावून सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.

मुलांसाठी सर्व्ह करण्याची कल्पना

मेथी थेपला (Methi Thepla) दही, लोणी, चीज स्प्रेड, टोमॅटो केचप किंवा घरच्या हिरव्या चटणीसोबत द्या. डब्यासाठीही हा बेस्ट ऑपशन आहे कारण तो बराच वेळ मऊ राहतो.

आरोग्यदायी फायदे (Health Benefites)

मेथीमध्ये लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.
गव्हाच्या पिठामुळे मुलांना ऊर्जा आणि आवश्यक कार्बोहायड्रेट्स मिळतात.
पचन सुधारण्यास मदत होते.
जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे मुलांना सारखं सारखं भूक लागत नाही.
शाळेच्या डब्यासाठी हा पौष्टिक आणि चविष्ट पर्याय आहे.

आजचा नाश्ता म्हणून मेथी थेपला बनवून मुलांच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. चव आणि पोषण यांचा उत्तम मेळ असलेला हा पदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

FAQs

1. मेथी थेपला मुलांसाठी चांगला नाश्ता का आहे?
मेथी थेपल्यामध्ये लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे मुबलक असतात. गव्हाच्या पिठामुळे ऊर्जा मिळते आणि तो पचनासाठीही फायदेशीर ठरतो.

2. मेथी थेपला डब्यासाठी योग्य आहे का?
होय. मेथी थेपला बराच वेळ मऊ राहतो, त्यामुळे तो शाळेच्या किंवा ऑफिसच्या डब्यासाठी उत्तम पर्याय आहे.

3. मेथी थेपला मऊ कसा बनवावा?
पीठ मळताना थोडे दही आणि तेल वापरा तसेच पीठ 10–15 मिनिटे झाकून ठेवा. त्यामुळे थेपले अधिक मऊ होतात.

4. मेथी थेपला कोणासोबत खायला चांगला लागतो?
मेथी थेपला दही, लोणी, हिरवी चटणी, लोणचे, चीज स्प्रेड किंवा टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करू शकता.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts