Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • ‘गुंगी गुडिया’चा राजकीय बॉम्ब! मुंबईत राष्ट्रवादीचा काँग्रेस कार्यालयात राडा
ताज्या बातम्या

‘गुंगी गुडिया’चा राजकीय बॉम्ब! मुंबईत राष्ट्रवादीचा काँग्रेस कार्यालयात राडा

Gungi Gudiya Sunetra Pawar
25

Gungi Gudiya Sunetra Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणात एका शब्दावरून नवा वाद पेटला आहे. काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करत ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबईतील काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत माफीची मागणी केली.

या वादाची सुरुवात बीडमधील एका पत्रकार परिषदेतून झाली. पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर असताना पत्रकारांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारला. मात्र, प्रश्न पूर्ण होण्याआधीच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पत्रकाराला थांबवल्याचा व्हिडिओ समोर आला. या प्रसंगात सुनेत्रा पवार शांत राहिल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसने सोशल मीडियावरून त्यांच्यावर निशाणा साधला.

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी; जाणून घ्या काय बदल होणार

किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील? ( Gungi Gudiya Sunetra Pawar )

काँग्रेसने अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये ‘सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील?’ असा सवाल केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी या टीकेचे समर्थन करत हा शब्द अपमानास्पद नसल्याचे म्हटले. तसेच त्यांनी इतिहासातील संदर्भ देत इंदिरा गांधींनाही सुरुवातीच्या काळात अशाच प्रकारच्या टीकेला सामोरे जावे लागल्याचे सांगितले.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयात जाऊन आंदोलन केले आणि काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी केली. राष्ट्रवादीकडून सवाल करण्यात आला की, ज्या शब्दाचा काँग्रेसने पूर्वी विरोध केला होता, तोच शब्द आज एका महिला नेत्यासाठी कसा वापरला जातो?

धनंजय मुंडे यांनीही प्रतिक्रिया

या प्रकरणावर धनंजय मुंडे यांनीही प्रतिक्रिया देत काँग्रेसवर टीका केली. सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाल्याने काँग्रेसकडून अशी टीका केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काँग्रेसच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

‘गुंगी गुडिया’ शब्दाचा इतिहास काय?

‘गुंगी गुडिया’ हा शब्द भारतीय राजकारणात यापूर्वीही चर्चेत आला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या सुरुवातीच्या राजकीय काळात विरोधकांकडून हा शब्द वापरून लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, पुढे त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे आणि नेतृत्वामुळे त्यांची प्रतिमा बदलली.

सध्या हा वाद केवळ एका शब्दापुरता मर्यादित नसून, महिला नेतृत्व, राजकीय टीकेची पातळी आणि आगामी राजकीय समीकरणांवरून आरोप-प्रत्यारोपांचा भाग बनला आहे. सुनेत्रा पवार या टीकेला कशा पद्धतीने उत्तर देतात आणि या वादाचा राजकीय परिणाम काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts