Vijay Thalapathy CM : विजय थलपती यांनी तामिनाडूच्या मुख्यमंत्री पदाचा धुरा संभाळल्यापासून अनेक मोठं मोठे निर्णय घेतले आहे..त्यांच्या निर्णयाचे देशभरातून मोठे कौतुक होत आहे…काम करावं तर सीएम थलपती यांच्या सारखं असं अनेकांना वाटत आहे..पण आता थलपती यांनी थेट तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या पुत्रावर हात घातला आहे…तामिळनाडू पोलिसांनी माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना थेट त्यांच्या निवास्थानावरून उचलंल आहे..पोलिसांनी उदयनिधी यांना अटक केल्यानंतर तामिनाडूतील राजकीय वातावरण तापलं आहे..डीएमके पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे..उदयनिधी यांना अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्यावर वक्तव्य करणं चांगलंच भोवलं आहे…त्रिशा यांच्यावर एका सभेत वक्तव्य केल्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी थेट उदयनिधी यांना अटक केली आहे…यानंतर आता विजय थलपती यांचं तामिळनाडूतील सरकार जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे…एमके स्टॅलिन पुन्हा तामिळनाडू सीएम बनणार, असंही म्हटलं जात आहे..पाहूयात की उदयनिधी स्टॅलिन यांना तामिळनाडू पोलिसांनी का अटक केली? या अटकेनंतर थलपतींचं सरकार जाऊ शकतं का? एमके स्टॅलिन पुन्हा मुख्यमंत्री कसं बनू शकतात?
उदयनिधी स्टॅलिन यांना अटक का झाली? ( Udhayanidhi Stalin Arrest )
उदयनिधी स्टॅलिन यांच्या अटकेनंतर तामिळनाडूच्या राजकारणात सत्तासमीकरणे हादरण्याची शक्यता निर्माण झाली आहे .. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि DMK पक्षाचे सर्वेसर्वा एम. के. स्टॅलिन यांचे सुपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना तामिळनाडू पोलिसांनी थेट त्यांच्या चेन्नईतील निवासस्थानावरून अटक केली आहे.. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्यावर एका जाहीर सभेत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे ही अत्यंत मोठी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे… या अटकेच्या कारवाईमुळे संपूर्ण तामिळनाडूमध्ये राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे…अवघ्या काही महिन्यांपूर्वी सत्तेत आलेले लोकप्रिय अभिनेते आणि मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांचं सरकार यामुळे कोसळणार का, अशी जोरदार चर्चा आता दिल्लीपासून चेन्नईपर्यंतच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे..
या संपूर्ण प्रकरणाची ठिणगी तंजावुर येथे कावेरी नदी जलविवादावरून आयोजित करण्यात आलेल्या डीएमके पक्षाच्या एका मोठ्या आंदोलनादरम्यान पडली… या जाहीर सभेत बोलताना विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन हे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या सरकारवर कडाडून टीका करत होते आणि तामिळनाडूला कावेरीच्या पाण्याचा एक थेंबही मिळत नसताना मुख्यमंत्री अनभिज्ञ असल्याचा आरोप करत होते… मात्र, त्यांचे भाषण सुरू असतानाच समोर बसलेल्या जमावातील काही लोकांनी अभिनेत्री तृषा कृष्णन यांचे नाव ओरडण्यास सुरुवात केली.. लोकांची ही घोषणाबाजी ऐकून उदयनिधी स्टॅलिन व्यासपीठावर क्षणभर थांबले, त्यांनी एक मिश्किल स्मितहास्य केले आणि वादग्रस्त टिप्पणी केली… उदयनिधी म्हणाले, “पाणी इतरत्र पोहोचो किंवा न पोहोचो, तिथे मात्र पोहोचायला हवं.” त्यांच्या या विधानानंतर सभेत एकच हशा पिकला… मात्र, हे विधान अंगलट येणार असल्याचे लक्षात येताच उदयनिधी यांनी लगेचच, “मला कावेरीचं पाणी म्हणायचं होतं,” असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. उदयनिधी यांच्या या डबल मिनिंग आणि आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि संपूर्ण राज्यात महिला संघटनांसह सर्वसामान्य जनतेमधून संतापाची तीव्र लाट उसळली…
हेही वाचा : रेपो रेटचा फैसला आज! EMI कमी होणार की व्याजदर
DMK आणि TVKमध्ये संघर्ष का वाढला?
या वक्तव्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री विजय यांच्या TVK पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली… या तक्रारीच्या आधारे तंजावूर पोलिसांनी उदयनिधी यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला… प्रकरणाचे गांभीर्य आणि वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन तंजावुर आणि निलांगराई पोलिसांच्या संयुक्त पथकाने आज सकाळी उदयनिधी यांच्या चेन्नईतील निलांगराई निवासस्थानाला वेढा घातला… निवासस्थानाबाहेर डीएमकेच्या कायदेशीर टीमसोबत प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर पोलिसांनी उदयनिधी स्टॅलिन यांना त्यांच्या घरातून अधिकृतपणे ताब्यात घेतले…. विरोधी पक्षाच्या एवढ्या बड्या नेत्याला थेट घरातून उचलल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली… ताब्यात घेतले जात असताना उदयनिधी यांनी हसतमुखाने ही कारवाई पूर्णपणे “राजकीय सूडबुद्धीने” प्रेरित आणि एक “जोक” असल्याचे सांगत आम्ही याविरोधात न्यायालयीन लढाई लढू, असा विश्वास व्यक्त केला.. दुसरीकडे, डीएमकेचे ज्येष्ठ नेते टी. आर. बालू यांनी उदयनिधींनी कोणाचंही नाव घेतले नसल्याचा दावा करत हे आरोप फेटाळले आहेत..
या अटकेच्या काही तासांनंतरच मद्रास उच्च न्यायालयात या प्रकरणावर तातडीने सुनावणी पार पडली.. न्यायालयाने पोलिसांना उदयनिधी यांची प्राथमिक चौकशी पूर्ण करून आणि त्यांना तपासात सहकार्य करण्याचे आदेश देत तात्काळ सोडून देण्याचे निर्देश दिले… न्यायालयाच्या या निर्णयामुळे उदयनिधी यांना तात्पुरता मोठा दिलासा मिळाला असला, तरी त्यांना पुढील तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे लागणार आहे… दुसरीकडे, आपल्या लाडक्या नेत्याला अटक झाल्याचे समजताच संपूर्ण तामिळनाडूत DMK पक्ष अत्यंत आक्रमक झाला आहे… चेन्नई, मदुराई, त्रिची आणि तंजावुरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हजारो डीएमके कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून टायर जाळून आणि मुख्य रस्ते अडवून तीव्र निदर्शने करत आहेत.
विजय थलपती सरकार कोसळू शकते का? ( Vijay Thalapathy CM )
ही कारवाई केवळ एका वादग्रस्त वक्तव्यामुळे झालेली दिसत असली, तरी या एका निर्णयामुळे मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार कोसळू शकते, अशी चर्चा होत आहे…पण खरंच थलपतींचं सरकार कोसळू शकतं का? तर याचे उत्तर आहे हो… तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या TVK पक्षाने सर्वाधिक 108 जागा जिंकल्या असल्या, तरी बहुमतासाठी आवश्यक असलेला 118 चा आकडा गाठण्यासाठी त्यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागलेली आहे…सध्या तरी काँग्रेससह काही छोट्या पक्षांनी थलपतींना पाठिंबा दिलेला आहे…जर या पक्षांनी पाठिंबा काढून घेतला तर थलपतींचं सरकार जाऊ शकतं…पण असं होऊ शकतं का? तर सध्याच्या राष्ट्रीय राजकारणात केंद्रातील भाजप सरकारला संसदेत डिलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खासदारांची गरज आहे… एम. के. स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाकडे सध्या संसदेत २२ खासदारांचे मोठे संख्याबळ आहे… आपल्या मुलाला मोठ्या कायदेशीर संकटातून वाचवण्यासाठी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीने स्वतःचा पक्ष, खासदार फुटण्यापासून रोखण्यासाठी एम. के. स्टॅलिन भाजपसोबत पडद्यामागून हातमिळवणी करू शकतात, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे…
देशभरात खासदार फुटताना दिसत आहे..पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार जाताच खासदार फुटले आहे..ठाकरे गटाचे 6 खासदार फुटून शिंदे गटात गेले आहेत…त्यामुळे आपला पक्ष आणि खासदार फुटू नये यासाठी एमके स्टॅलिन खूपच सावधान आहे…या बिलला जरी स्टॅलिन विरोध करत असले तरी खासदार आणि पक्ष टिकवण्यासाठी ते तडजोडीची भूमिका घेऊ शकतात…गेल्या काही दिवसांपासून भाजप स्टॅलिन यांना आपल्या बाजूने वळण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे…भाजपकडून स्टॅलिन यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची ऑफर असल्याची चर्चा आहे…स्टॅलिन हे विजय थलपती यांना धडा शिकवण्यासाठी आणि पक्ष टिकवण्यासाठी भाजप सोबत हात मिळवणी करू शकतात, अशी चर्चा आहे…
हेही वाचा : कोणतेही औषध किंवा ठोस उपचार नाहीत… गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसमुळे
तामिळनाडूच्या राजकारणावर पुढे काय परिणाम होऊ शकतो?
थलपती विजय यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना आपल्या बाजूने वळवणे भाजपसाठी अत्यंत सोपे आहे.. केंद्राच्या दबावामुळे किंवा अंतर्गत तडजोडीमुळे जर या 4 ते 5 आमदारांनी थलपती विजय सरकारचा पाठिंबा अचानक काढून घेतला, तर विजय यांचे सरकार लगेच कोसळेल… अशा परिस्थितीत थलपती विजय या ‘समान शत्रू’ला सत्तेतून बेदखल करण्यासाठी तामिळनाडूच्या इतिहासात कधीही एकत्र न आलेले डीएमके (DMK), अण्णा द्रमुक (AIADMK) आणि भाजप हे तीन मोठे पक्ष एकत्र येऊन राज्यात एक नवे महाआघाडी सरकार स्थापन करू शकतात… त्यामुळे उदयनिधी यांच्या एका वादग्रस्त विधानाने आणि त्यांच्या अटकेने तामिळनाडूच्या सत्तेच्या चाव्या आता दिल्ली आणि चेन्नईतील पडद्यामागच्या राजकीय तडजोडींवर आणून ठेवल्या असून, आगामी काळात तामिळनाडूतील सत्तासंघर्ष अधिकच रंजक वळण घेण्याची शक्यता आहे…विजय थलपती यांच्या TVK पक्षापासून भाजप, DMK, AIADMK या सर्वच पक्षांना मोठा धोका आहे..आपलं राजकीय भविष्य टिकवण्यासाठी हे पक्ष एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा आहे…









