Twin Babys : बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे…आदिवासी बहुल एका छोट्याशा गावात महिलेने चक्क चार बाळांना जन्म दिला आहे..विशेष म्हणजे महिलेची प्रसूती घरीच झाली असून सर्व बाळांची प्रकृती चांगली आहे..चारही बाळांचा जन्म झाल्यानंतर महिलेला रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे..पण प्रश्न असा निर्माण झालाय की महाराष्ट्रात पहिल्यांदाच चार जुळ्या बाळांचा जन्म झाला आहे का? एकाच वेळी चार जुळ्या बाळांचा जन्म होण्या मागचं कारण काय?
आदिवासी भागातील दुर्मिळ घटनेने डॉक्टरही चक्रावले ( Twin Babys )
चार जुळ्या बाळांचा जन्म होण्याची बुलढाण्यातील ही पहिलीच घटना आहे…आदिवासी बहुल भागातील ‘चारबन’ या गावातून ही एक अत्यंत दुर्मिळ आणि थक्क करणारी घटना समोर येताच सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.. गावातील रहिवासी पंशिराम सस्त्या यांची 27 वर्षीय पत्नी रियानी यांनी कोणत्याही वैद्यकीय सुविधेविना अत्यंत कठीण परिस्थितीत घरीच बाळांना जन्म दिला आहे…महिलेने तीन मुलं आणि एका मुलीला जन्म दिलाय.. प्रसूतीनंतर माता आणि चारही नवजात बालकांना तातडीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले… डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत आई रियानी आणि चारही बाळांची प्रकृती सुदैवाने स्थिर असल्याचे आढळले…
हेही वाचा : E20 इंधन वाद : अमेरिकेच्या दबावामुळे भारतात इथेनॉल सक्तीचं?
डॉक्टरांनी काय दिली माहिती?
बाळांचा जन्म झाल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी बाळांची तपासणी केली.. बाळांचे वजन ९०० ग्रॅम ते १ किलोदरम्यान आहे.. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, लाखो किंवा करोडो प्रसूतींमागे घडणारी ही अत्यंत दुर्मिळ घटना असून, अशा प्रकरणात मुदतीपूर्व प्रसूतीमुळे बाळांचे वजन कमी असणे स्वाभाविक असते… सध्या खामगाव येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली माता आणि बालकांवर उपचार सुरू असून संपूर्ण परिसरात या घटनेची मोठी चर्चा आहे..
चार जुळ्या बाळांच्या जन्मामागील वैज्ञानिक कारण ( Twin Babys )
महाराष्ट्रात एकाच वेळी चार बाळांचा जन्म ( Twin Babys ) होण्याची ही पहिलीच घटना नाही..यापूर्वी साताऱ्यासह पुणे आणि मुंबई या ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत…मात्र कोणत्या उपचाराशिवाय, सुविधांशिवाय बाळांना जन्म देण्याची ही पहिलीच घटना आहे…पण एकाच वेळी चार जुळ्या बाळांचा जन्म कशामुळे होतो? असा प्रश्न अनेकांना पडलाय..तर नैसर्गिक गर्भधारणेमध्ये सामान्यतः स्त्रीच्या शरीरातून दरमहा केवळ एकच अंडं बाहेर पडते. मात्र, काही वेळा संप्रेरकांच्या बदलांमुळे किंवा अनुवांशिक कारणांमुळे एकाच वेळी चार वेगवेगळी अंडी बाहेर पडतात आणि ती पुरुषाच्या चार वेगवेगळ्या शुक्राणूंशी फलित होतात..यामुळे चार बाळांचा जन्म होतो..तसंच काही दुर्मिळ केसेसमध्ये, एक किंवा दोन फलित अंडी गर्भाशयात गेल्यानंतर त्यांचे स्वतःहून दोन किंवा चार भागात विभाजन होते. जर एकाच अंड्याचे चार भाग झाले, तर जन्माला येणारी चारही बाळे हुबेहूब सारखी दिसतात..









