Sun Ketu Conjunction: ज्योतिषशास्त्रानुसार १७ ऑगस्टला सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार असून, आधीपासून असलेल्या केतूसोबत त्याची युती होणार आहे. या ग्रहस्थितीचा काही राशींवर परिणाम होण्याची शक्यता असून, करिअर आणि आर्थिक बाबतीत सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.
Sun Ketu Conjunction: ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology 2026) १७ ऑगस्ट २०२६ रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत केतू आधीपासून असल्याने सूर्य केतूची युती (Sun Ketu Conjunction) तयार होईल. या ग्रहस्थितीचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींसाठी हा काळ थोडा कसोटीचा ठरू शकतो.
सूर्याला आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि मान- सन्मानाशी संबंधित ग्रह (Sun Transit Leo) मानलं जातं, तर केतूचा संबंध अध्यात्म आणि वैराग्याशी जोडला जातो. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या (Sun Ketu Conjunction) संयोगामुळे निर्णयक्षमता, आत्मविश्वास तसेच कामाच्या ठिकाणी परिस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रात व्यक्त केली जाते. त्यामुळे या काळात कोणत्या राशीन अधिक काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊयात.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरी किंवा व्यवसायात मोठे निर्णय घेताना घाई करणं टाळा. एखादी महत्त्वाची खरेदी करण्याचा विचार असल्यास नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना प्रत्येक बाब तपासून पाहणं योग्य ठरेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत मतभेद होणार नाहीत, याची काळजी घ्या. छोट्या मुद्द्यांवरून वाद वाढवण्याऐवजी शांतपणे परिस्थिती हाताळा. या काळात आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो, त्यामुळे स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे.
कन्या राशी (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या जातकांसाठी आर्थिक बाबतीत हा काळ सावधगिरीचा आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढण्याची शक्यता असल्याने बजेटकडे विशेष लक्ष द्या. एखादं महत्त्वाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचूनही अचानक रखडू शकतं. त्यामुळे त्यातून निर्माण होणारा ताण वाढू देऊ नका. पैशांशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य माहिती मिळवा. कार्यक्षेत्रात आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्यावर भर द्या. इतरांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करणं टाळल्यास अनेक समस्या दूर राहू शकतात.
मीन राशी (Pisces Horoscope)
मीन राशीच्या व्यक्तींनी या काळात आरोग्याला प्राधान्य देणं आवश्यक आहे. कामाच्या व्यापामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्या. व्यवसाय किंवा कामानिमित्त लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान आरोग्यासोबतच महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर आवश्यक वस्तूंची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करताना विशेष सावध राहा. कोणताही व्यवहार घाईघाईने करू नका. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनातही समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. जोडीदाराच्या मतांचा आणि भावनांचा आदर केल्यास नात्यातील गैरसमज टाळता येतील.









