Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • माणूस झाला चक्क कुत्रा! २२० कोटींच्या दाव्यामागचं सत्य काय? जपानी टोकोची भन्नाट कहाणी आहे तरी काय?
ताज्या बातम्या

माणूस झाला चक्क कुत्रा! २२० कोटींच्या दाव्यामागचं सत्य काय? जपानी टोकोची भन्नाट कहाणी आहे तरी काय?

viral dog

Toco Japan Dog: जपानमधील टोको नावाच्या व्यक्तीचा सध्या सोशल मीडियावर कुत्र्यासारखा दिसणारा लूकचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सध्या जपान (Japan News) मधील ‘टोको’ नावाच्या व्यक्तीची जोरदार चर्चा सुरू आहे. टोकोने चक्क कुत्र्यासारखं रूप धारण केल्याचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओसोबत तो कुत्र्यासारखा दिसण्यासाठी तब्बल २२० कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दाव्यामागील सत्य समोर आल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचं चित्र वेगळंच असल्याचं स्पष्ट होतं.

हेही वाचा: ‘टॉक्सिक’मधील यशसोबतच्या इंटिमेट सीन्सवर कियारा अडवाणी स्पष्टच बोलली; म्हणाली, ‘या भूमिकेने मला…’

टोकोने खरंच २२० कोटी रुपये खर्च केले?

व्हायरल पोस्टमध्ये टोकोने स्वतःला कुत्र्यासारखं बनवण्यासाठी २२० कोटी रुपये खर्च केल्याचं म्हटलं आहे. मात्र, जुन्या मीडिया रिपोर्ट्समध्ये याला दुजोरा मिळत नाही.

उपलब्ध माहितीनुसार टोकोच्या (Toco Japan Dog) खास पोषाखासाठी जवळपास २० लाख जपानी येन खर्च करण्यात आले होते. त्यावेळेच्या विनिमय दरानुसार ही रक्कम भारतीय चलनात साधणार ११ ते १२ लाख रुपये इतकी होती.
म्हणजेच सोशल मीडियावर सांगितली जाणारी २२० कोटींची रक्कम आणि प्रत्यक्ष पोषाखासाठी झालेला खर्च यात प्रचंड फरक आहे.

ना प्लास्टिक सर्जरी, ना शरीरात बदल

टोकोने कुत्र्यासारखं दिसण्यासाठी शरीरावर कोणतीही शस्त्रक्रिया केली नसल्याचं उपलब्ध माहितीतून स्पष्ट होतं. त्याने एका विशेष कंपनीकडून तयार करून घेतलेला अत्यंत बारकाईने बनवलेला पोशाख परिधान केला आहे.

चित्रपट आणि जाहिरातींसाठी वास्तवदर्शी पोशाख तयार करणाऱ्या जपानी कंपनीकडे त्याने आपली मागणी दिली होती. टोकोला विशेषतः बॉर्डर कॉली या कुत्र्याच्या प्रजातीसारखं दिसायचं होतं. त्यानुसार हा पोशाख तयार करण्यात आला.

पोशाख घातल्यानंतर तो चार पायांच्या कुत्र्याप्रमाणे चालताना दिसतो. याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली.

‘मला प्राण्यासारखं जीवन अनुभवायचं होतं’

टोकोला लहानपणापासूनच प्राण्यांविषयी आकर्षक असल्याचं सांगितलं जातं. नेहमीच्या आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळं अनुभवण्याची इच्छा त्याच्या मनात होती. त्यातूनच त्याने कुत्र्यासारखं रूप धारण करण्याचा निर्णय घेतला. या अनोख्या प्रयोगानंतरही टोकोची इच्छा इथेच थांबलेली नाही. भविष्यात पांडा किंवा अस्वलासारखं रूप घेण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली होती.

त्यामुळे ‘माणसाने कुत्रा होण्यासाठी २२० कोटी रुपये खर्च केले’ हा सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणारा ठरतो. प्रत्यक्षात टोकोने लाखो रुपये खर्च करून तयार केलेला विशेष पोशाख घातला असून, त्याच्या माध्यमातून कुत्र्यासारखं दिसण्याचा अनुभव घेतला आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts