Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अंगात आलेली महिला, नोटांनी भरलेली कार अन् कापलेली अनामिका; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’च्या टीझर २ ने वाढवलं गूढ
मनोरंजन

अंगात आलेली महिला, नोटांनी भरलेली कार अन् कापलेली अनामिका; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’च्या टीझर २ ने वाढवलं गूढ

Maharashtra Epstein Files
5
Maharashtra Epstein Files: अंगात आलेली महिला, नोटांनी भरलेली कार आणि कापलेली अनामिका… या थरारक दृश्यांनी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’च्या दुसऱ्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

कॅप्टीन अशोक खरात (Ashok Kharat Movie) प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ (Maharashtra Epstein Files Teaser 2) या सिनेमाचा नवा टिझर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपासून पहिला टिझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली होती. आता नुकताच दुसरा टिझर प्रदर्शित (Maharashtra Epstein Files latest news) झाल्याने पुन्हा एकदा या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. टिझरमध्ये पैशांनी भरलेली बॅग, रहस्यमय प्रसंग आणि ‘ज्याच्याकडे देवी शक्ती असते ना, त्याने डोक्यावर बाँम्ब लावलेला लक्षात आला असता…’ असा संवाद ऐकायला मिळतो. त्यामुळे या सिनेमात नेमकं काय पाहायला मिळणार, याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

हेही वाचा: श्वेता तिवारी भडकली! सोशल मीडियावरील शिवीगाळीवरून मराठी माणसांना सवाल; राज ठाकरेंनाही थेट प्रश्न

दुसऱ्या टिझरमध्ये नेमकं काय?

दुसऱ्या टिझरची सुरुवात एका रहस्यमय प्रसंगाने होते. एका महिलेच्या अंगात काहीतरी आल्याचं दृश्य पाहायला मिळतं. त्यानंतर अचानक पैशांनी भरलेली कारची डिक्की दिसते. मात्र सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा प्रसंग म्हणजे मंदिरातील दृश्य.

या सीनमध्ये अभिनेत्रीच्या हातातील कापलेली अनामिक दिसते. त्यामुळे टीझरमध्ये नेमकं कोणतं रहस्य दडलं आहे, हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. अशोक खरातच्या कथित दैवी शक्तींच्या दाव्यांमागचं सत्य सिनेमातून मांडलं जाणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. तर हा सिनेमा आपल्या सर्वच्या भेटीला 2 ऑक्टोबर 2026 रोजी येणार आहे.

दीपाली सय्यद यांची भूमिका चर्चेत

या चित्रपटात दीपाली सय्यद (Deepali Sayyed movie) महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. उपलब्ध माहितीनुसार त्या रुपाली चाकणकर यांच्यावर आधारित व्यक्तिरेखा साकारत आहेत. त्यांच्या लूकचीही यापूर्वी मोठी चर्चा झाली होती. (Maharashtra Epstein Files latest news)

चित्रपटातील अशोक खरातची भूमिका कोण साकारणार, याबाबत मात्र निर्मात्यांनी अद्याप पूर्णपणे सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यामुळे टीझरमधील प्रत्येक दृश्य बारकाईने पाहण्याचा प्रयत्न प्रेक्षकांकडून केला जात आहे.

‘आता सगळं उघड होणार…’

महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ची टॅगलाइनच ‘आता सगळं उघड होणार…!’ अशी आहे. त्यामुळे सिनेमात अशोक खरात प्रकरणाशी संबंधित कोणते पैलू दाखवले जाणार, याकडे लक्ष लागलं आहे. (Maharashtra Epstein Files 2026)

हा सिनेमा केवळ एका कथित भोंदूबाबाच्या प्रकरणापुरता मर्यादित राहणार की त्यातून महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय संदर्भांवरही भाष्य केलं जाणार, याची उत्सुकता आहे.

सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली

स्वरूप बी. सावंत दिग्दर्शित हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ (Marathi movie 2026) रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, चित्रपटाशी संबंधित वादही चर्चेत आला आहे. दीपाली सय्यद यांनी यापूर्वी चित्रपटातील भूमिकेमुळे धमकीचे फोन आल्याचा दावा केला होता. त्यामुळे टीझरनंतर आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या कथानकावर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts