Breaking News :
  • Home
  • Mumbai
  • रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठीचा ‘रुल’; राज्यभर धडक तपासणी, १,२६८ जणांना नोटिसा
महाराष्ट्र

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठीचा ‘रुल’; राज्यभर धडक तपासणी, १,२६८ जणांना नोटिसा

Maharashtra Marathi Language Rule
0
Maharashtra Marathi Language Rule: रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची राज्यभर अंमलबजावणी सुरू झाली आहे. परिवहन विभागाच्या विशेष तपासणीत आतापर्यंत १२६७ चालकांना मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

राज्यात व्यावसायिक रिक्षा आणि टॅक्सी (Marathi Rule for Drivers) चालवणाऱ्या चालकांना दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेले मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी परिवहन विभागाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली असून, पहिल्याच टप्प्यात मारुतीचे पुरेसे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या १,२६८ चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

प्रवाशांना रिक्षा किंवा टॅक्सी सेवा (auto taxi inspection Maharashtra) घेताना चालकांशी सहज संवाद साधता यावा, तसेच दैनंदिन व्यवहारात भाषेची अडचण निर्माण होऊ नये, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: तेल विक्रेत्यांनो सावधान! मुंढेंच्या आदेशाने सुट्या तेलावर बंदी; नियम मोडल्यास मोठी कारवाई

मुंबईसह MMR मध्ये ३,९९५ चालकांची तपासणी

मुंबई आणि महानगर प्रदेशातील रिक्षा-टॅक्सी चालकांची विशेष तपासणी करण्यात आली. या मोहिमेत एकूण ३,९९५ चालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६०४ चालकांना दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक मराठीचे ज्ञान नसल्याचे आढळून आले. या चालकांना नियमांचे पालन करण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. ( LS Marathi News Channel )

राज्यातील इतर भागांतही तपासणी

मुंबई आणि उपनगरांव्यतिरिक्त राज्यातील विविध जिल्ह्यांमध्येही परिवहन विभागाने तपासणी केली. या भागात ४,२२२ चालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६६४ चालकांना मराठी भाषेचे आवश्यक व्यावहारिक ज्ञान नसल्याचे आढळले. त्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

अशा प्रकारे मुंबई महानगर प्रदेश आणि राज्यातील इतर भागांमध्ये झालेल्या कारवाईत एकूण १,२६८ चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

मराठी शिकण्यासाठी वेळ, पण नियमातून सूट नाही

अमराठी चालकांना मराठी भाषा आत्मसात करण्यासाठी यापूर्वीही विविध माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. सरकारने चालकांबाबत सहानुभूतीची भूमिका घेतली असून, भाषा शिकण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जात असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts