Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • मुलाला वाचवण्यासाठी वडिलांची धाव; डोंगरावर घडलेल्या दुर्घटनेत आई-वडील अन् मुलाचा मृत्यू
गुन्हा

मुलाला वाचवण्यासाठी वडिलांची धाव; डोंगरावर घडलेल्या दुर्घटनेत आई-वडील अन् मुलाचा मृत्यू

Khavdya Dongar Tragedy
2
Khavdya Dongar Tragedy: छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर हृदयद्रावक घटना घडली. मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा दरीत पडून मृत्यू झाला, तर त्यानंतर आईचाही दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आई- वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. वाळूज परिसरातील खवड्या डोंगरांवर एकाच कुटुंबातील तिघांचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये १८ वर्षीय कुणाल चांदवडे, त्याचे वडील मुरलीधर चांदवडे आणि आई संगीता चांदवडे यांचा समावेश आहे. या घटनेनंतर देवळाई-सातारा परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुणाल डोंगरावर गेल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना (Family Death) आणि स्थानिक नागरिकांना मिळाली होती. त्यानंतर त्याला रोखण्यासाठी आणि सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. या प्रयत्नांदरम्यान परिस्थिती अचानक बिघडली आणि कुणाल व त्याचे वडील मुरलीधर दोघेही डोंगराच्या कड्यावरून खाली पडल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना पाहिल्यानंतर संगीत चांदवडे यांनीही टोकाचे पाऊल उचलायचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. त्या देखील डोंगरावरून खाली पडल्या. या दुर्घटनेत तिघांचाही मृत्यू झाला.

हेही वाचा: पंटर पाठवला, खातरजमा केली अन् थेट छापा; अकलूदच्या कुंटणखान्यावर पोलिसांचा दणका!

पोलिसांना आधीच मिळाली होती माहिती

कुणाल डोंगरावर (Khavdya mountain accident) असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले होते. कुणालला सुरक्षितपणे परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढील कार्यवाही सुरू केली.

नेमकं कारण काय?

कुणालने हे टोकाचे पाऊल का उचलण्याचा प्रयत्न केला, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक, वैयक्तिक किंवा अन्य कोणत्या कारणातून ही परिस्थिती निर्माण झाली होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेशी संबंधित व्यक्तींची माहिती आणि परिस्थितीचा तपास केल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

परिसरात हळहळ

एका कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. चांदवडे कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या संकटामुळे नातेवाईक, मित्र आणि स्थानिक नागरिकांमध्ये शोकाचे वातावरण आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts