Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • MPSCचा मोठा निर्णय! ड्रग इन्स्पेक्टर भरती रद्द; विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा
एजुकेशन- जॉब

MPSCचा मोठा निर्णय! ड्रग इन्स्पेक्टर भरती रद्द; विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा

MPSC
8
MPSC: पेपरफुटीच्या आरोपांनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ड्रग इन्स्पेक्टर ( गट- ब) पदाची भरती प्रक्रिया रद्द केली आहे. आता उमेदवारांसाठी नव्याने स्क्रीनिंग परीक्षा घेण्यात येणार असून, परीक्षेच्या तारखेची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ( MPSC) औषध निरीक्षक म्हणजेच ड्रग इन्स्पेक्टर ( गट- ब) पदासाठी घेण्यात आलेली भरती परीक्षा रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या आरोपानंतर आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द केली आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी मेहनत घेतलेल्या उमेदवारांनी आता पुन्हा स्क्रीनिंग परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू होती. २२ मार्च रोजी झालेल्या स्क्रीनिंग परीक्षेनंतर प्रश्नपत्रिकेबाबत गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर परीक्षेतील अनियमिततेबाबत महत्त्वाची माहिती समोर आल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: पालघरमध्ये १८ वर्षीय तरुणाच्या तक्रारीवरून २२ महिलांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

तपासादरम्यान एका उमेदवाराला परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचा संच उपलब्ध झाल्याचे आणि त्याचा कथित फायदा घेतल्याचे समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत MPSC ने आधीची प्रक्रिया रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.

या प्रकरणाचा मुद्दा राजकीय आणि विद्यार्थी स्तरावरही चांगलाच चर्चेत आला होता. आमदार रोहित पवार यांनी परीक्षेतील कथित पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध माध्यमांतून आपला विरोध नोंदवला. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. MPSC चा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, आता नव्याने परीक्षा कधी होणार, याची उत्सुकता उमेदवारांना लागली आहे.


आयोगाकडून पुनर्परीक्षेची तारीख, वेळ आणि इतर आवश्यक माहिती अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली जाणार आहे. नव्या परीक्षेची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडावी, अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त होत आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts