Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकअपने उघड केली MPSC पेपरफुटी? औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट
एजुकेशन- जॉब

ब्रेकअपने उघड केली MPSC पेपरफुटी? औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट

MPSC Paper Leak
7

MPSC Paper Leak: महाराष्ट्रलोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक (गट -ब) (MPSC paper leak case) पदासाठी झालेल्या चाळणी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलं आहे. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केली असून, त्यामध्ये एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कदायक बाब म्हणजे एका ब्रेकअपने पेपरफुटीचा भांडाफोड झाल्याचा पोलिसांचा दावा.

प्रेयसीला मिळाला पेपर

पोलिसांच्या आरोपानुसार, लोकेश उर्फ गौरव पाटील याला परीक्षा होण्यापूर्वी होण्यापूर्वी त्याची प्रेयसी ऋतुजाकडून प्रश्नपत्रिका (MPSC question paper leak) मिळाली होती. ऋतुजाला हा पेपर आधीच मिळाला होता आणि तिने तो परीक्षेच्या दोन दिवस आधी व्हॉट्सॲपवरून गौरवला पाठवल्याचा आरोप आहे. यानंतर २२ मार्च रोजी औषध निरीक्षक पदासाठी परीक्षा झाली. निकाल जाहीर झाल्यानंतर ऋतुजाने या परीक्षेत सातवा क्रमांक पटकावला. मात्र याच काळात गौरव आणि ऋतुजाचं नातं संपुष्टात आलं.

हेही वाचा: रक्षाबंधनासाठी साडी-सूटवर बांगड्यांचा परफेक्ट लूक! हे ७ ट्रेंडी कॉम्बिनेशन नक्की करा ट्राय

ब्रेकअपनंतर पेपरफुटीचा खुलासा?

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ब्रेकअपनंतर गौरवला ऋतुजाला सरकारी नोकरी ( Maharashtra government Job) मिळाल्यानंतर ती आपल्यापासून कायमची दूर जाईल, अशी भीती वाटत होती. त्यानंतर त्याने एमपीएससीकडे पेपरफुटीची तक्रार केल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे, गौरवने सुरुवातीला स्वतःला स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व्यक्तीचा मित्र असल्याचं सांगत एमपीएससीला ई-मेल केला आणि २२ मार्चच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा केला.

मात्र तपास पुढे गेल्यानंतर गौरव स्वतःही या पेपरफुटीच्या साखळीत सहभागी असल्याचं समोर आल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

पेपर कसा बाहेर आला?

गुन्हे शाखेच्या तपासानुसार, प्रवीण पाटील यांनी एमपीएससीशी (MPSC Drug Inspector exam) संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाच लाख रुपये दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर आणखी पैसे देण्याचं आश्वासनही दिल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर अमृत पाटील यांनी ती परीक्षा होण्याच्या काही दिवस आधी आपली मुलगी ऋतुजाला दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर ऋतुजाने पेपर गौरवला पाठवल्याचं तपासात समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. गौरवच्या भावालाही हा पेपर देण्याचा प्रयत्न झाल्याचं तपास यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहे.

ऋतुजाला पोलिसांची नोटीस

या प्रकरणात परीक्षेत सातवा क्रमांक मिळवणाऱ्या ऋतुजालाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तिला परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका मिळाली होती, असा आरोप तपास यंत्रणेकडून करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातील प्रत्येक आरोपीची भूमिका आणि त्यांच्यावरील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे.

पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढणार?

एमपीएससीच्या परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या अटक आणि तपासातून प्रश्नपत्रिका नेमकी किती जणांपर्यंत पोहोचली, त्यातून आणखी कोणी फायदा घेतला आणि या संपूर्ण नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास केला जात आहे. त्यामुळे औषध निरीक्षक भरतीच्या पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एका कथित ब्रेकअपपासून सुरू झालेल्या तक्रारीने एवढ्या मोठ्या पेपरफुटीच्या प्रकरणाचा पर्दाफाश कसा केला, याचीच सध्या सर्वत्र चर्चा आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts