Breaking News :
  • Home
  • Top News
  • विद्यार्थ्यांनो! टपाल तिकिटे जमा करा आणि मिळवा 6 हजारांची शिष्यवृत्ती; जाणून घ्या कसे
एजुकेशन- जॉब

विद्यार्थ्यांनो! टपाल तिकिटे जमा करा आणि मिळवा 6 हजारांची शिष्यवृत्ती; जाणून घ्या कसे

Deen Dayal SPARSH Yojana
3
Deen Dayal SPARSH Yojana: विद्यार्थ्यांनो…जर तुम्हाला टपाल तिकिटे जमा करण्याची आवड असेल, तर या छंदातून तुम्ही ₹6,000 ची शिष्यवृत्ती मिळवू शकता. कोणाला मिळणार ही शिष्यवृत्ती आणि त्यासाठी काय करावे लागेल? चला, जाणून घेऊया.

विद्यार्थ्यांनो, तुमचा छंदच आता तुमच्यासाठी कमाईची संधी ठरू शकतो. आता टपाल तिकिटे जमा करण्याची आवड असेल, तर तुम्हाला चक्क ₹6,000 ची शिष्यवृत्ती मिळू शकते. केंद्र सरकारच्या टपाल विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘दीनदयाळ स्पर्श योजना’ अंतर्गत इयत्ता 6वी ते 9वीतील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती (scholarship for class 6 to 9 students ) दिली जाते. विशेष म्हणजे, देशभरातील 920 विद्यार्थ्यांची यासाठी निवड केली जाणार आहे. या योजनेसाठी कोण पात्र आहे, अर्ज कसा करायचा आणि शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी काय करावे लागेल? जाणून घेऊया…

हेही वाचा: मुंबईकरांना मोठा झटका! साखरेनंतर आता दूधाच्या दरात तब्बल 9 रुपयांची वाढ? जाणून घ्या नेमकं कारण

काय आहे दीनदयाळ स्पर्श योजना? (Deen Dayal SPARSH Yojana)

विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच फिलाटेली म्हणजेच टपाल तिकिटांचा संग्रह आणि अभ्यास याबाबत आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने टपाल विभागाने ही योजना सुरू केली आहे.

या योजनेमुळे विद्यार्थ्यांना टपाल तिकिटांच्या माध्यमातून इतिहास, संस्कृती, कला, विज्ञान, व्यक्ती आणि विविध घटनांची माहिती मिळवता येते. अभ्यासासोबतच ज्ञानवर्धक छंद जोपासण्यासाठी ही योजना विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरू शकते.

दरवर्षी मिळणार 6,000 रुपये

दीनदयाळ स्पर्श योजनेअंतर्गत (Deen Dayal SPARSH Yojana) निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 6,000 रुपये ची शिष्यवृत्ती दिली जाते. म्हणजेच विद्यार्थ्यांना दरमहा ₹500 मिळतात. ही रक्कम दर तिमाहीला 1,500 रुपये या प्रमाणे दिली जाते.

920 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

या योजनेअंतर्गत देशभरातून एकूण 920 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. प्रत्येक टपाल परिमंडळातून जास्तीत जास्त 40 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यामध्ये इयत्ता 6वी, 7वी, 8वी आणि 9वी या प्रत्येक वर्गातून 10 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. (student scholarship scheme)

कोण करू शकतो अर्ज?

या शिष्यवृत्तीसाठी काही महत्त्वाच्या पात्रता अटी आहेत.

– अर्जदार विद्यार्थी इयत्ता 6वी ते 9वीमध्ये नियमितपणे शिकत असावा.
– विद्यार्थी भारतातील मान्यताप्राप्त शाळेत शिक्षण घेत असावा.
– विद्यार्थ्याच्या शाळेत फिलाटेली क्लब असणे आणि विद्यार्थी त्या क्लबचा सदस्य असणे आवश्यक आहे.
– शाळेत फिलाटेली क्लब नसल्यास, स्वतःच्या नावावर Philately Deposit Account असलेला विद्यार्थीही पात्र ठरू शकतो.
– विद्यार्थ्याने मागील अंतिम परीक्षेत किमान 60 टक्के गुण किंवा समतुल्य ग्रेड/ग्रेड पॉइंट मिळवलेले असावेत.
– SC/ST विद्यार्थ्यांना 5 टक्के गुणांची सवलत दिली जाते.

निवड कशी केली जाते?

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड केवळ शैक्षणिक गुणांवर होत नाही. विद्यार्थ्यांना फिलाटेलीबाबतची आवड आणि ज्ञानही सिद्ध करावे लागते.

प्रत्येक टपाल परिमंडळाकडून फिलाटेली क्विझ (philately scholarship) आयोजित केली जाते. याशिवाय विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयांवर फिलाटेली प्रकल्प तयार करून सादर करावा लागतो.

या प्रकल्पांचे मूल्यांकन टपाल विभागाचे अधिकारी आणि नामांकित फिलाटेलिस्ट यांच्या समितीकडून केले जाते. त्यानंतर प्रत्येक टपाल परिमंडळाकडून अंतिम लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

विद्यार्थ्यांना मिळणार फिलाटेली मेंटरचे मार्गदर्शन

या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सहभागी शाळांना फिलाटेली मेंटरचे मार्गदर्शन मिळू शकते. हा मेंटर विद्यार्थ्यांना टपाल तिकिटांचा (6000 scholarship for students)  संग्रह कसा करावा, फिलाटेलीचा अभ्यास कसा करावा आणि प्रकल्प कसा तयार करावा याबाबत मार्गदर्शन करतो. तसेच शाळेत फिलाटेली क्लबच्या निर्मितीसाठीही मदत केली जाते.

अर्ज कसा करायचा? (Deen Dayal SPARSH Application)

या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने केली जाऊ शकते.

अर्ज करण्यासाठी पुढील प्रक्रिया आहे:

दीनदयाळ स्पर्श योजनेचा अर्जाचा नमुना डाउनलोड करावा.
अर्जातील आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी.
आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.
अर्ज संबंधित Regional Head किंवा Divisional Head यांच्याकडे नोंदणीकृत टपाल, स्पीड पोस्टद्वारे पाठवावा किंवा प्रत्यक्ष जमा करावा.
विशेष म्हणजे, शाळादेखील आपल्या विद्यार्थ्यांच्या वतीने अर्ज करू शकते. शाळेतील इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज एकत्रितपणे शाळेच्या प्रमुखांकडून पाठवता येतात.

हेही वाचा: श्रावण शुक्रवार अन् रक्षाबंधन एकाच दिवशी! लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करा ‘हे’ 3 खास उपाय

कोणती कागदपत्रे आवश्यक?

अर्ज करताना विद्यार्थ्यांकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे:

मागील परीक्षेची गुणपत्रिका
शाळेचे बोनाफाइड प्रमाणपत्र
फिलाटेली क्लबचे सदस्यत्व किंवा फिलाटेली खात्याचा तपशील
ओळखपत्र
बँक खात्याचे तपशील
लागू असल्यास जात प्रमाणपत्र

शिष्यवृत्तीची रक्कम कशी मिळणार?

निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांची यादी IPPB/POSB कडे पाठवली जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांना पालकांसह इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) किंवा पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक (POSB) मध्ये संयुक्त खाते उघडावे लागते. या खात्यामध्ये शिष्यवृत्तीची रक्कम नियमानुसार जमा केली जाते.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts