Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • श्रावण शुक्रवार अन् रक्षाबंधन एकाच दिवशी! लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करा ‘हे’ 3 खास उपाय
संस्कृती

श्रावण शुक्रवार अन् रक्षाबंधन एकाच दिवशी! लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करा ‘हे’ 3 खास उपाय

Raksha Bandhan 2026
0
Raksha Bandhan 2026: यंदा रक्षाबंधन २८ ऑगस्ट रोजी शुक्रवारी साजरं केलं जाणार आहे. या दिवशी माता लक्ष्मीची कृपा मिळावी आणि घरात सुख-समृद्धी नांदावी, यासाठी काही धार्मिक उपाय करण्याची परंपरा आहे. चला तर जाणून घेऊया, नेमके कोणते तीन उपाय करावेत.

यंदा रक्षाबंधन (Raksha Bandhan 2026) २८ ऑगस्ट रोजी शुक्रवारी साजरं केलं जाणार आहे. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सण असला, तरी यंदा या दिवसाला आणखी एक विशेष धार्मिक महत्त्व आहे. श्रावण  शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित मानला जात असल्याने या दिवशी देवीची पूजा (Lakshmi Puja on Raksha Bandhan) आणि काही धार्मिक उपाय करण्याची परंपरा आहे. तसेच भावाला राखी बांधताना शुभ मुहूर्त, राखी बांधण्याची योग्य पद्धत आणि पूजेतील काही गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते. घरात सुख-समृद्धी नांदावी यासाठी कोणते उपाय करावेत आणि रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात? चला, जाणून घेऊया.

हेही वाचा: नारळी पौर्णिमा म्हणजे काय? कुठे आणि का साजरी केली जाते? जाणून घ्या आजच्या दिवशीचं महत्व

राखी बांधताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा (Raksha Bandhan tips)

रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यापूर्वी ताटात कुंकू, अक्षता, दिवा, मिठाई आणि राखी ठेवण्याची परंपरा आहे. सर्वप्रथम भावाला औक्षण करून कपाळावर कुंकवाचा टिळा लावावा आणि त्यानंतर राखी बांधावी.

धार्मिक मान्यतेनुसार राखी बांधताना भावाचं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असणं शुभ मानलं जातं. राखी बांधल्यानंतर भावाला मिठाई भरवून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते.

१. माता लक्ष्मीची पूजा करा

शुक्रवार (Friday Lakshmi Puja) हा माता लक्ष्मीला समर्पित असल्याने रक्षाबंधनाच्या दिवशी देवीची विशेष पूजा करता येते. घरातील देवघर स्वच्छ करून लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटोसमोर दिवा लावावा. देवीला फुलं, हळद- कुंकू, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करावी.

२. घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावा

संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावण्याची परंपरा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होतं. तुपाचा दिवा लावताना माता लक्ष्मीचं स्मरण करून घरात सुख-शांती आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना करावी.

३. नारळाचा नैवेद्य दाखवा

नारळाला हिंदू धर्मात शुभ आणि पवित्र मानलं जातं. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी माता लक्ष्मीला श्रीफळ म्हणजेच नारळ अर्पण करण्याची परंपरा काही ठिकाणी पाहायला मिळते. तसंच नारळापासून तयार केलेला गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवू शकता. पूजेनंतर हा प्रसाद कुटुंबातील सदस्यांना द्यावा.

४. भावाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करा

रक्षाबंधनाचा मुख्य उद्देश भाऊ-बहिणीचं नातं अधिक घट्ट करणं हा आहे. राखी बांधताना बहिणीने भावाच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करावी. तसेच भावानेही बहिणीला तिच्या आयुष्यात प्रत्येक अडचणीच्या वेळी साथ देण्याचं वचन देण्याची परंपरा आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी काय टाळावं? (Raksha Bandhan do and don’ts)

धार्मिक मान्यतेनुसार सणाच्या दिवशी घरात भांडण, वादविवाद किंवा नकारात्मक वातावरण ठेवणं टाळावं. पूजा करताना मन शांत ठेवावं आणि श्रद्धेने विधी करावेत. राखी बांधताना तुटलेली किंवा खराब झालेली राखी वापरण्याऐजवी नवीन राखी वापरण्याची परंपरा आहे. तसेच पूजेचं साहित्य स्वच्छ आणि व्यवस्थित असावं.

महत्वाची गोष्ट

वरील उपाय धार्मिक श्रद्धा आणि परंपरांवर आधारित आहेत. यामुळे धनलाभ किंवा आर्थिक समस्या निश्चितपणे दूर होतील, असा वैज्ञानिक पुरावा नाही. श्रद्धेनुसार हे उपाय केल्याने मानसिक समाधान आणि सकारात्मक भावना मिळू शकतात. रक्षाबंधनाचा हा खास दिवस भाऊ-बहिणीच्या प्रेमासोबतच कुटुंबातील सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करत आनंदाने साजरा करा.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts