प्रशांत जगताप | सातारा
Satara Crime News: सातारा शहरात दहशत निर्माण करणाऱ्या सात जणांच्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या टोळीला पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या आदेशाने संपूर्ण सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
सातारा शहरात दहशत (Satara Police Action) निर्माण करणाऱ्या आणि वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सात जणांच्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा (Satara Police News) कलम ५५ अंतर्गत या टोळीला संपूर्ण सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी दिला आहे.
हेही वाचा: पुण्यात मोठी कारवाई! दोन प्रसिद्ध हॉटेल्सवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
सात जणांवर पोलिसांचा मोठा बडगा
हद्दपार करण्यात आलेल्या टोळीत खालील आरोपींचा समावेश आहे.
ऋषिकेश उर्फ दादा शशिकांत पवार (२२), काळोशी, कोडोली टोळीप्रमुख
जितेंद्र दिपक सुर्वे (२२)
पृथ्वीराज भीमराव साळुंखे
संदिप दादा वलेकर (२२)
अनिकेत दादा वलेकर (२२)
प्रेम उर्फ बबलू विलास पार्टे (२४)
सिद्धार्थ विवेक महाडिक (१८)
कोणते गंभीर गुन्हे दाखल?
टोळीतील सदस्यांविरोधात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
दरोड्याची तयारी
खुनाचा प्रयत्न
मारामारी व दुखापत
शिवीगाळ आणि दमदाटी
अनधिकृतपणे प्रवेश
हत्यारांसह बेकायदेशीर जमाव
बेकायदा दारूविक्री
प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही गुन्हेगारी सुरूच
पोलिसांकडून संबंधितांवर वेळोवेळी अटक आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही गुन्हेगारी कारवाया सुरू राहिल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कठोर भूमिका
टोळीचा वाढता उपद्रव लक्षात घेता नागरिकांकडून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला.
हद्दपारीचा प्रस्ताव कसा पुढे गेला?
सातारा शहर पोलीस ठाण्याचे (Satara Police News) प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत टोळीला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाची चौकशी सातारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी केली.
सहा महिन्यांसाठी संपूर्ण जिल्ह्यातून हद्दपार
प्रस्तावावर हद्दपार प्राधिकरणासमोर सुनावणी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी सातही जणांना संपूर्ण सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला.
सराईत गुन्हेगारांना पोलिसांचा इशारा
सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गरजेनुसार हद्दपारी, मोक्का आणि एमपीडीए यांसारख्या कठोर कायदेशीर कारवायांचा वापर केला जाणार आहे.
कारवाईत पोलिसांचे योगदान
अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि सातारा शहर पोलिसांच्या पथकाने या कारवाईसाठी आवश्यक पुरावे सादर केले.
या कारवाईत पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सनस तसेच सातारा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दिपक इंगवले, संदीप पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल सापते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.






