Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • 485 रुपयांत 72 दिवसांची सुट्टी! BSNLचा हा प्लॅन पाहून Jio यूजर्सही म्हणतील ‘वा!’
विज्ञान- तंत्र

485 रुपयांत 72 दिवसांची सुट्टी! BSNLचा हा प्लॅन पाहून Jio यूजर्सही म्हणतील ‘वा!’

BSNL New Plan
41
BSNL New Plan: महागड्या रिचार्जमुळे त्रस्त असलेल्या मोबाईल युजर्ससाठी BSNL चा ४८५ रुपयांचा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो. या रिचार्जमध्ये ७२ दिवसांची व्हॅलिडिटी, दररोज २ GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० SMS मिळतात. त्यामुळे Jio आणि airtel च्या तुलनेत हा प्लॅन किती स्वस्त आहे. जाणून घेऊया.

मोबाईल रिचार्जच्या (BSNL Recharge Plan) वाढत्या खर्चामुळे स्वस्त आणि दीर्घ वैधता असलेल्या प्लॅनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी BSNL चा एक प्लॅन लक्षवेधी ठरतो. ४८५ रुपयांच्या या रिचार्जमध्ये ७२ दिवसांची वैधता आणि दररोज २ GB डेटा मिळतो. त्यामुळे कमी खर्चात जास्त दिवस सेवा सुरू ठेवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा पर्याय उपयोगी ठरू शकतो. (BSNL Plan 2026)

४८५ रुपयांत काय मिळते?

दररोज 2GB हाय-स्पीड इंटरनेट डेटा (BSNL Data Plan)
कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग
दररोज 100 SMS
72 दिवसांची वैधता

दिवसाचा 2GB डेटा पूर्ण झाल्यानंतर इंटरनेट पूर्णपणे बंद होत नाही. त्यानंतर स्पीड कमी होऊन 40 Kbps राहतो. या प्लॅनसोबत कोणतेही अतिरिक्त OTT सब्सक्रिप्शन मिळत नाही.

हेही वाचा: ‘वाइब’च्या ट्रेलर लॉन्चमध्ये सोहाचा कुणालवर कौतुकाचा वर्षाव; सांगितली पतीची मजेशीर किस्से

जिओचा प्लॅन किती महाग? ( Jio Recharge Plan )

जिओच्या तुलनेत BSNLच्या या प्लॅनची किंमत लक्षणीय कमी आहे. जिओच्या 2GB डेली डेटा आणि 84 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी 1,029 रुपये मोजावे लागतात.

म्हणजेच जिओकडून सुमारे 12 दिवस अधिक वैधता मिळत असली तरी त्यासाठी BSNLच्या प्लॅनपेक्षा जवळपास दुप्पट खर्च करावा लागतो. ( LS Marathi News Channel )

एअरटेल

एअरटेलच्या 2GB प्रतिदिन डेटा आणि 84 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनची किंमत 979 रुपये आहे.

BSNLच्या 485 रुपयांच्या प्लॅनच्या तुलनेत एअरटेलचा प्लॅन जवळपास दुप्पट किमतीचा ठरतो. मात्र, एअरटेल आणि जिओच्या काही प्लॅनमध्ये OTT सब्सक्रिप्शनसह अतिरिक्त फायदे मिळतात, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे.

मग कोणासाठी BSNLचा प्लॅन फायदेशीर? (BSNL Recharge Plan)

ज्यांना कमी बजेटमध्ये जास्त दिवसांसाठी रोजचा डेटा आणि कॉलिंग हवे आहे, त्यांच्यासाठी BSNLचा हा प्लॅन विचार करण्यासारखा आहे. विशेषतः सेकंडरी नंबर वापरणारे ग्राहक किंवा ज्या ठिकाणी BSNLचे नेटवर्क चांगले उपलब्ध आहे, अशा ग्राहकांना या प्लॅनचा फायदा होऊ शकतो.

नंबर पोर्ट करण्यापूर्वी हे नक्की तपासा

फक्त स्वस्त रिचार्ज पाहून नेटवर्क बदलण्याचा निर्णय घेण्याऐवजी आपल्या भागात BSNLचे नेटवर्क कव्हरेज आणि इंटरनेट स्पीड कसा आहे, हे आधी तपासणे महत्त्वाचे आहे. नेटवर्क चांगले असल्यास 485 रुपयांचा हा प्लॅन खर्चाच्या दृष्टीने आकर्षक पर्याय ठरू शकतो. थोडक्यात सांगायचे तर, कमी किमतीत दीर्घ वैधता आणि रोज 2GB डेटा हवा असेल, तर BSNLचा 485 रुपयांचा प्लॅन जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत बजेटच्या दृष्टीने पुढे आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts