Vibe Trailer: ‘वाइब’च्या ट्रेलर लॉन्चमध्ये सोहा अली खानने पती कुणाल केमूचं भरभरून कौतुक केलं. कुणालच्या विनोदी स्वभावाबद्दल बोलताना सोहाने त्याच्या आयुष्यातील काही मजेशीर किस्सेही शेअर केले.
बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक कुणाल केमू आपल्या विनोद अभिनयासाठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. पडद्यावर पडद्यावर आपल्या कॉमेडीने हसवणारा कुणाल खऱ्या आयुष्यातही तितकाच मिश्कील असल्याचे त्याची पत्नी आणि अभिनेत्री सोहा अली खानने सांगितले. मुंबईत आगामी ‘वाइब’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च ( Vibe Movie Trailer Launch ) कार्यक्रमात सोहाने कुणालच्या स्वभावाविषयी काही मजेशीर गोष्टी सांगितल्या.
सोहा अली खाननी काय सांगितले?
कार्यक्रमात ‘वाइब’च्या संपूर्ण टीमचे कौतुक करताना सोहाने (Soha Ali Khan) कुणालच्या (Kunal Kemmu) विनोदबुद्धीचा खास उल्लेख केला. तिच्या म्हणण्यानुसार, कुणाल ज्या ठिकाणी असतो तिथे वातावरण हलकंफुलकं करण्याची जबाबदारी तो सहजपणे घेतो. प्रसंग कोणताही असो, आपल्या विनोदाने समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची त्याची सवय आहे.
इतकंच नाही, तर दोन्ही कुटुंबांमध्येही कुणालची ओळख ‘सगळ्यात मजेदार व्यक्ती’ अशीच असल्याचे सोहाने सांगितले. त्यामुळे त्याचा हा स्वभाव केवळ अभिनयापुरता मर्यादित नसून, दैनंदिन आयुष्यातही तो तितकाच विनोदी असल्याचे स्पष्ट होते.
आगामी चित्रपट ‘वाइब’ ( Vibe Movies )
दरम्यान, कुणालने 2024 मध्ये ‘मडगाव एक्सप्रेस’ या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. आता तो ‘वाइब’च्या माध्यमातून पुन्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात कुणाल स्वतः प्रमुख भूमिकेतही (Kunal Kemmu New Movie) झळकणार आहे.
चित्रपटाची कथा काय आहे?
‘वाइब’ची कथा दोन सामान्य मित्रांची आहे. एका अनपेक्षित परिस्थितीमुळे हे मित्र गंभीर आणि धोकादायक दहशतवादी कटात अडकतात. त्यामुळे विनोदासोबतच थरार आणि संकटांचा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. LS Marathi News Channel
कोण कोण या चित्रपटात दिसणार आहे?
या चित्रपटात प्रीती झिंटा, स्पर्श श्रीवास्तव, दिनेश लाल यादव, वंशिका धीर आणि यशपाल शर्मा यांच्याही भूमिका आहेत. विशेष म्हणजे कुणालची सासू आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांचीही चित्रपटात विशेष उपस्थिती असणार आहे. त्यामुळे ‘वाइब’ हा कुणालच्या अभिनय आणि दिग्दर्शन कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे.



