Dahi Handi 2026, Mumbai Thane Dahi Handi: मुंबई-ठाण्यातील प्रमुख दहीहंडी उत्सव, गोविंदा पथकांसाठी जाहीर लाखोंची बक्षिसे आणि संपूर्ण यादी जाणून घ्या.
‘गोविंदा आला रे आला…’ च्या जयघोषने आज मुंबई- ठाण्यासह (Mumbai – Thane Dahi Handi 2026) संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमणार आहे. थरावर थर रचत दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली असून, शहरातील विविध भागांमध्ये दहीहंडीचा थरार पाहायला मिळणार आहे. ढोल-ताशांचा गजर, गोविंदाचा उत्साह आणि उंचच उंच मानवी मनोरे यामुळे दहीहंडी उत्सवाला चांगलीच रंगत येणार आहे.
मुंबई आणि ठाण्यात यंदा अनेक भव्य दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात (Dahi Handi Events Mumbai- Thane ) आले आहे. विशेष म्हणजे, गोविंदा पथकांची आयोजकांकडून लाखो रुपयांच्या बक्षिसांची घोषणा (Dahi Handi Prize) करण्यात आली आहे. त्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्येही मोठीचुरस पाहायला मिळणार आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून गोविंदा पथकांकडून दहीहंडीसाठी सराव सुरू होता. यंदा काही पथके नऊ ते दहा थर रचण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. पावसाचे आव्हान असले तरी गोविंदाचा उत्साह कायम असून, मुंबई आणि ठाण्यातील प्रमुख दहीहंडी उत्सवांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाण्यात ७१ लाखांच्या बक्षिसांची घोषणा
आमदार शिवाजीराव पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात तब्बल ७१ लाख रुपयांच्या बक्षिसांचे वाटप केले जाणार आहे. या दहीहंडीला ‘ सेलेब्रिटी दहीहंडी’ अशी विशेष ओळख आहे. त्यामुळे गोविंदा पथकांसोबत राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीचीही उत्सुकता आहे. (Dahi Handi Events Mumbai- Thane)
प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीत 51 लाखांपर्यंत बक्षीस
आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फेही मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांसाठी 21 लाख ते 51 लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे या दहीहंडीत विजेतेपदासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
रविंद्र फाटक यांच्या दहीहंडीसाठी 21 लाख
ठाण्यातील आमदार रविंद्र फाटक यांच्या वतीनेही दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गोविंदा पथकांसाठी या दहीहंडीत 21 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
टेंभी नाका आणि नौपाड्यातही लाखोंची बक्षिसे
टेंभी नाका येथे दिघे समर्थकांच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात गोविंदा पथकांसाठी 11 लाख ते 25 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत.
तर नौपाडा परिसरात अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे विजेत्या गोविंदा पथकांना 11 लाख ते 21 लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत.
घाटकोपरमध्ये मनसेची 51 लाखांची हंडी
मुंबईतील (Mumbai Latest News ) घाटकोपर परिसरात मनसेचे गणेश चुक्कल यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवासाठी 51 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सेलिब्रिटींची उपस्थितीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
घाटकोपरसोबतच वरळी, दादर, बोरिवली आणि चेंबूर परिसरातही भव्य दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत दिवसभर उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार आहे.
ठाण्यात 254 दहीहंडी उत्सवांना परवानगी
दरम्यान, ठाणे ( Thane Latest News) पोलिसांनी शहरातील 254 दहीहंडी आयोजनांना परवानगी दिली आहे. त्यामुळे ठाण्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे.
लाखोंच्या बक्षिसांमुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवातील स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. आता गोविंदा पथके किती थर रचतात आणि कोणते पथक दहीहंडी फोडण्यात बाजी मारते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





