Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • लालबागच्या राजाच्या चरणी ठेवलेली ₹500 ची नोट काही सेकंदांत गायब? व्हायरल VIDEO ने खळबळ
Ganeshotsav 2026

लालबागच्या राजाच्या चरणी ठेवलेली ₹500 ची नोट काही सेकंदांत गायब? व्हायरल VIDEO ने खळबळ

Lalbaugcha Raja 2026
20

Lalbaugcha Raja 2026 : लालबागचा राजा…कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान…देश विदेशातून भाविक याठिकाणी दर्शनाला येतात…हेच भाविक मोठ्या श्रद्धेनं दरवर्षी कोट्यवधींचं दान राजाच्या चरणी चढवतात, मात्र लालबाग राजाच्या मंडळातील लोक स्वत:ला सेवेकरी म्हणून तर घेतात, मात्र हे नक्की सेवेकरी आहेत की खिसेभरी आहेत…असा सवाल उपस्थित करणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय.

लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेली पाचशे रुपयांची नोट अवघ्या काही सेकंदांत गायब झाल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, या व्हिडिओमुळे गणेशभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना ९० च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मधू शाह यांच्या दर्शनादरम्यान घडली, तिथे उपस्थित असलेल्या सेवेकऱ्यांच्या भूमिकेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मधू शाह यांनी बाप्पाच्या चरणी अर्पण केली ₹500 ची नोट ( Madhoo Shah Lalbaugcha Raja )

गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक तासन्तास रांगेत उभे राहतात. सामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि उद्यो गपतींपर्यंत सर्वजण बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी मुंबईत येतात. यंदाच्या उत्सवा दरम्यान, ‘रोजा’ आणि ‘फूल और कांटे’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मधू शाह बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्य व्यासपीठावर आली होती. व्हीआयपी कोट्यातून मिळालेल्या विशेष दर्शनादरम्यान मधू यांनी बाप्पाची मनोभावे पूजा केली आणि आरतीचे ताट बाप्पाच्या चरणाजवळ ठेवले. या ताटात त्यांनी दक्षिणा म्हणून पाचशे रुपयांची एक नोट अर्पण केली.

मधू शाह यांनी नोट ताटात ठेवल्यानंतर, त्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे तिथे उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांकडे आणि चाहत्यांकडे पाहून हात उंचावण्यासाठी मागे वळल्या. नेमक्या याच काही सेकंदांच्या कालावधीत, बाप्पाच्या भव्य मूर्तीच्या अगदी मागे उभ्या असलेल्या एका पांढऱ्या पोशाखातील सेवेकऱ्याने अत्यंत चपळाईने ती पाचशे रुपयांची नोट उचलली. नोट उचलल्यानंतर त्या सेवेकऱ्याने ती सर्वांसमोर न ठेवता किंवा मुख्य दानपेटीत न टाकता, बाजूलाच असलेल्या लाल रंगाच्या कपड्याच्या मागे अत्यंत छुप्या पद्धतीने लपवून ठेवली. ही संपूर्ण घटना तिथे सुरू असलेल्या थेट प्रक्षेपणाच्या कॅमेऱ्यात अगदी स्पष्टपणे कैद झाली आणि त्यानंतर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर पसरला.

हेही वाचा : लालबागच्या राजाच्या चरणी कोट्यवधींचे दान! 5 दिवसांत किती पैसा, सोने-चांदी जमा? आकडा

दानाची रक्कम हाताळण्यावर नेटकऱ्यांचे प्रश्न ( Lalbaugcha Raja 2026 )

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कारभारावर आणि तिथल्या सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे. “सामान्य भाविक आपल्या कष्टाची कमाई बाप्पाच्या चरणी विश्वासाने अर्पण करतात, हा प्रकार म्हणजे थेट चोरी असून लाखो भाविकांच्या धार्मिक भावनांशी आणि विश्वासाशी खेळ आहे. इतक्या घाईघाईने आणि कपड्याच्या मागे लपवून ती नोट बाजूला का काढली गेली, याचे उत्तर मंडळाने दिले पाहिजे अशी मागणी अनेकजण करतायत.

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या मंडळात दरवर्षी व्हीआयपी संस्कृती, सामान्य भाविकांना मिळणारी दुय्यम वागणूक आणि सुरक्षेच्या नावाखाली होणारी धक्काबुक्की यांवरून नेहमीच वाद होत असतात. पण यावेळी थेट दानाच्या रकमेवरच डल्ला मारल्याचा संशय निर्माण करणारा व्हिडिओ समोर आल्यामुळे मंडळाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भाविकांच्या श्रद्धेचा हा विषय असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित सेवेकऱ्याची सत्यता समोर यावी, अशी मागणी जोर धरत आहे. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून किंवा अभिनेत्री मधू शाह यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे मंडळ नेमकं काय स्पष्टीकरण देतं, या प्रकरणावर कशा प्रकारची सारवासारव करतं, हेही कळेलच….

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts