Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • “बाबा, माझे आठही मित्र बुडाले…”; शिवचा फोन अन् कुटुंबीयांच्या काळजात धस्स, दिवेआगर दुर्घटनेने आळंदी हादरली
गुन्हा

“बाबा, माझे आठही मित्र बुडाले…”; शिवचा फोन अन् कुटुंबीयांच्या काळजात धस्स, दिवेआगर दुर्घटनेने आळंदी हादरली

Diveagar Beach Accident
59
Diveagar Beach Accident: दिवेआगर समुद्रकिनारी झालेल्या दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेतून शिव सुखरूप बचावला; मात्र मित्रांच्या मृत्यूची बातमी देताना त्याचा तो फोनवरचा आक्रोश ऐकून कुटूंबीय हादरले. आळंदी परिसरात या घटनेने शोककळा पसरली आहे.

दिवेआगर समुद्रकिनारी (Diveagar Beach Accident) पुणे परिसरातील विद्यार्थ्यांच्या सहलीदरम्यान घडलेल्या दुर्घटनेने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आठ विद्यार्थ्यांचा (8 Students Drowned) समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर आळंदी परिसरात (Pune Students Drowned) हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेतून शिव संतोष (Shiv Nichang) निचंग हा विद्यार्थी सुखरूप बचावला; मात्र त्याच्या जवळच्या मित्रांचा मृत्यू झाल्याने (Pune Students Drowned) त्याच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा: मुलीच्या वर्तणुकीवरून वाद अन् टोकाचे पाऊल; साताऱ्यात हर्षदा हत्याप्रकरण, नेमकं काय घडलं?

फोन बंद

शिव हा अकरावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत असून आळंदीतील विनर ॲकॅडमीमध्ये कलासला जातो. गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास तो आपल्या कलासमधील मित्रांसोबत कोकणातील सहलीसाठी रवाना झाला होता.

दिवेआगर येथे पोहोचल्यानंतर त्याने कुटूंबियांना फोन करून आपण सुखरूप पोहोचल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर समुद्रात विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती शीवच्या वडिलांना मोबाईलवरून मिळाली.

मुलाची संपर्क साधण्यासाठी त्यांनी तातडीने शिवला फोन केला. मात्र त्याचा मोबाईल बंद असल्याने कुटूंबियांची चिंता वाढली. त्याच दरम्यान दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांची नावे समोर आली.

मृतांच्या यादीत मित्रांची नावे पाहून धक्का

मृत विद्यार्थ्यांची नावे पाहत असतानाच शिवाचा फोन त्याच्या वडिलांना आला. शिव सुखरूप असल्याचे समजताच कुटूंबियांची जीव भांड्यात पडला. मात्र फोनवरून शिवने आपल्या मित्रांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आणि भावनाविवश झाला.

मी सुरक्षित आहे, माझी काळजी करू नका; पण माझे मित्र बुडाले,” असे सांगताना शिवाचा आवाज दाटून आल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

शिवला आरोग्याची समस्या

शिवला मधुमेहाचा त्रास असून त्याला नियमित औषधोपचाराची गरज असते. सहलीदरम्यान त्याची वेळेवर औषधे घेण्याची काळजी मित्र घेत असल्याचे कुटूंबियांनी सांगितले.

ज्या मित्रांकडे शिवाची काळजी घेण्याची जबाबदारी होती, त्यांचाच या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने निचंग कुटूंबावर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. शिवचे वडील संतोष निचंग यांनी सांगितले की, मुलाचे मित्र त्यांच्या कुटूंबासाठीही मुलांसारखेच होते. त्यामुळे या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरले आहे.

आळंदीत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

दिवेआगर येथे विद्यार्थ्यांच्या बुडण्याची माहिती आळंदी परिसरात पोहोचताच पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आपल्या मुलांशी संपर्क साधण्यासाठी अनेक पालकांनी फोन करण्यास सुरुवात केली.

क्लासच्या ठिकाणीही पालकांची गर्दी झाली होती. आपल्या मुलांची माहिती मिळावी, यासाठी अनेक पालक चिंतेत होते. काही पालकांनी आपल्या भावना अनावर झाल्याने हंबरडा फोडला.

या दुर्घटनेत शिव बचावला असला तरी त्याच्या जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याने त्याच्यासह त्याच्या कुटुंबावर दुःखाचे सावट आहे. दिवेआगरच्या या घटनेने विद्यार्थी सहलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts