• Home
  • लाईफस्टाईल
  • मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करताय? ‘या’ गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल
आरोग्य

मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करताय? ‘या’ गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल

Mental Health Effects
Mental Health Effects: रोजच्या धावपळीत तुम्हीही स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करताय? सावधान! याचा परिणाम तुमच्या शारीरिक आरोग्यावरही होऊ शकतो. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात? चला, जाणून घेऊया!

World Mental Health Day 2026: आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो; मात्र सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजेच ‘मनाकडे’ अनेकदा दुर्लक्ष (Mental Health Problems) करतो. शरीराचा कोणताही भाग दुखू लागला की आपण लगेच डॉक्टरांकडे धाव घेतो; पण मन थकलं की, ‘हा तर साधा ताण आहे, जाऊ दे!’ असं म्हणत त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, सततचा ताण( Chronic Anxiety ), चिंता आणि भावनिक अस्वस्थता यांना किरकोळ समजून दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम केवळ मानसिक आरोग्यावरच (Mental Health Effects) नाही, तर शारीरिक आरोग्यावरही होऊ शकतो. त्यामुळे मानसिक आरोग्याची (Stress Management) योग्य वेळी काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

चला तर, जाणून घेऊया मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष ( Mental Health Awareness) केल्यास आपल्या शरीरावर कोणते परिणाम होऊ शकतात आणि त्यापासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय (Mental Health Tips) करता येतील.

हेही वाचा: कार्डिअ‍ॅक अरेस्टच्या आधी शरीरात होतात ‘हे’ बदल; लक्षणं ओळखणं का महत्त्वाचं? जाणून घ्या

मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम

मनाच्या आरोग्याकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे व्यक्तीला केवळ मानसिकच नव्हे, तर शारीरिक समस्यांनाही तोंड द्यावे लागते:

क्रॉनिक ॲक्झायटी (Chronic Anxiety)

सतत काळजी करणे, विनाकारण भीती वाटणे आणि शांत झोप न लागणे.

क्लीनिकल डिप्रेशन (Clinical Depression)

नैराश्य Clinical Depression) इतके वाढते की व्यक्तीला जगण्यातला रस निघून जातो, एकटेपणा आणि नैराश्येची भावना घेरते.

शारीरिक आजार (Psychosomatic Disorders)

मानसिक ताण जास्त प्रमाणात झाल्यामुळे उच्च रक्तदाब (High BP), मधुमेह (Diabetes), डोकेदुखी आणि पचनाचे गंभीर विकार जडू शकतात.

बर्नआउट (Burnout)

कामाचा किंवा जीवनाचा अति ताण आल्यामुळे शारीरिक व मानसिक ऊर्जा (Mental Health Care) पूर्णपणे संपून जाते.

हेही वाचा: Lucky Zodiac Signs 10 October 2026: १० ऑक्टोबरला पितरांचा आशीर्वाद की नशिबाची साथ? सर्वपित्री अमावस्येला ‘या’ राशींची चर्चा!

मनाचे आरोग्य सुधारण्यासाठी काय करावे?

पुरेशी झोप घ्या

नियमित वेळेत झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा.

व्यायाम करा

चालणे, योगासने किंवा इतर आवडता व्यायाम केल्याने तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते.

संतुलित आहार घ्या

पौष्टिक आहार आणि पुरेसे पाणी याकडे लक्ष द्या.

ध्यान आणि श्वसनाचे व्यायाम करा

नियमित सरावामुळे मन शांत ठेवण्यास मदत होऊ शकते.

आपल्या भावना व्यक्त करा

जवळच्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलल्याने भावनिक आधार मिळू शकतो.

कामातून विश्रांती घ्या

सतत काम करण्याऐवजी स्वतःसाठी वेळ काढा आणि आवडत्या गोष्टी करा.

तज्ज्ञांची मदत घ्या

गरज भासल्यास मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) किंवा समुपदेशकाची (Counselor) मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका.

हेही वाचा: CJP Jantar Mantar Delhi Protest Live: दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा, अभिजीत दीपके आंदोलनावर ठाम; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts