IT Jobs In India : IT क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये भारतातील सक्रिय टेक जॉब ओपनिंग्सची संख्या 1.23 लाखांवर पोहोचली आहे. Xpheno च्या Active Tech Jobs Outlook अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत टेक जॉब्समध्ये 17 टक्के वाढ झाली असून, सप्टेंबरच्या तुलनेतही 5 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. मात्र, या वाढीचा सर्वाधिक फायदा अनुभवी उमेदवारांना होत असल्याचं आकडेवारीतून दिसतं.
1.23 लाख टेक जॉब्समध्ये कोणत्या उमेदवारांना संधी?
अहवालानुसार, भारतात उपलब्ध असलेल्या सक्रिय टेक जॉब ओपनिंग्सपैकी मोठा हिस्सा मध्यम आणि वरिष्ठ अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी आहे.
- एकूण सक्रिय टेक जॉब्स: 1.23 लाख
- Mid-senior पदे: 68,000
- Entry-level पदे: 15,000
- IT Services क्षेत्रातील पदे: 66,000
- Global Capability Centres (GCCs) मधील पदे: 18,000
Mid-senior पदांचा एकूण संधींमध्ये सुमारे 55 टक्के वाटा आहे. दुसरीकडे, फ्रेशर्ससाठी असलेल्या Entry-level पदांची संख्या सप्टेंबरच्या तुलनेत 6 टक्क्यांनी कमी झाली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 15 टक्के वाढ नोंदवण्यात आली.
हेही वाचा : IT म्हणजे नेमकं काय? IT कंपनीत काम करणारे लोक दिवसभर काय करतात?
कोणत्या टेक स्किल्सना मागणी आहे? ( IT Jobs In India )
कंपन्यांकडून केवळ पारंपरिक IT कौशल्यांऐवजी विशेष तांत्रिक कौशल्ये आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांनाही प्राधान्य दिलं जात आहे.
सध्या लक्ष देण्यासारखी क्षेत्रे:
- AI Engineering आणि Machine Learning
- Data Analytics आणि Business Analytics
- Software Development आणि Engineering
- Technical Project Management
- Technology Consulting
- Technical Leadership
यापैकी प्रत्येक क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या सारखी नाही. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदासाठी आवश्यक कौशल्ये, अनुभव आणि शैक्षणिक पात्रता तपासणे महत्त्वाचे आहे.
कोणत्या शहरांमध्ये टेक जॉब्स अधिक आहेत?
Xpheno च्या अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये बंगळुरू हे टेक भरतीचं प्रमुख केंद्र राहिलं.
- बंगळुरू: 31,000 सक्रिय पदे
- हैदराबाद: 14,000 सक्रिय पदे
- दिल्ली-NCR: 9,000 सक्रिय पदे
- Tier-2 आणि Tier-3 शहरे: एकत्रित 40,000 सक्रिय पदे
Tier-2 आणि Tier-3 शहरांतील सक्रिय टेक जॉब्समध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 67 टक्के वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे मोठ्या IT शहरांबाहेर नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांनीही उपलब्ध संधी तपासाव्यात.
हेही वाचा : अमेरिकेचा भारतीय IT कंपन्यांना मोठा झटका! TCS, Infosysसह 8 कंपन्यांच्या Green Card प्रक्रियेला ब्रेक
फ्रेशर्सनी नोकरी मिळवण्यासाठी काय करावं? ( Tech Jobs in India )
टेक जॉब्सची एकूण संख्या वाढली असली तरी फ्रेशर्सना नोकरी मिळण्यासाठी केवळ पदवी पुरेशी ठरेलच असं नाही. संबंधित क्षेत्रातील मूलभूत ज्ञान, प्रत्यक्ष प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप आणि मुलाखतीची तयारी यांवर लक्ष केंद्रित करणं उपयुक्त ठरू शकतं.
- निवडलेल्या क्षेत्रातील एक किंवा दोन कौशल्यांवर चांगली पकड मिळवा.
- स्वतःचे प्रोजेक्ट्स तयार करून पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करा.
- इंटर्नशिप आणि Entry-level पदांसाठी नियमित अर्ज करा.
- Resume मध्ये संबंधित कौशल्ये आणि प्रोजेक्ट्स स्पष्टपणे नमूद करा.
- नोकरीच्या जाहिरातीतील पात्रता आणि अनुभवाच्या अटी काळजीपूर्वक वाचा.
टेक जॉब मार्केटबाबत महत्त्वाची गोष्ट ( IT Jobs 2026 )
भारतामध्ये सक्रिय टेक जॉब ओपनिंग्स 18 महिन्यांतील उच्चांकावर पोहोचल्या आहेत, ही सकारात्मक बाब आहे. मात्र, 1.23 लाख हा आकडा म्हणजे सर्व फ्रेशर्सना सहज नोकरी मिळेल असा अर्थ नाही. उपलब्ध पदांपैकी मोठा हिस्सा अनुभवी उमेदवारांसाठी असल्याने नव्या उमेदवारांनी योग्य कौशल्ये विकसित करण्यावर भर देणं आवश्यक आहे.









