• Home
  • लाईफस्टाईल
  • Mary Millben: मोदींच्या समर्थक मेरी मिलबेन कोण? CJP फंडिंगच्या आरोपामुळे चर्चा
राजकारण

Mary Millben: मोदींच्या समर्थक मेरी मिलबेन कोण? CJP फंडिंगच्या आरोपामुळे चर्चा

Mary Millben
8

Mary Millben : कॉक्रोच जनता पार्टीला अमेरिकेतून फंडिग होते, असा आरोप सिंगर मेरी मिलबेन यांनी केला आहे…पण सीजेपीवर आरोप करणाऱ्या अमेरिकन सिंगर मेरी मिलबेन कोण आहेत? त्यांनी भारतातील घडामोंडीवर का भाष्य केलंय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल…तर मेरी मिलबेन या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात…त्यांनी यापूर्वी अनेकदा मोदींच्या नेतृत्वाचं जाहीरपणे कौतुक करत त्यांच्या राजकीय विरोधकांवर टीका केली आहे… जून 2023 मध्ये मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान मिलबेन यांनी भारताचं राष्ट्रगीत सादर केलं होतं आणि त्यानंतर मोदींच्या पाया पडून आदर व्यक्त केला होता….

त्यामुळे सिंगर मेरी मिलबेन यांच्या आरोपावर आता प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे… त्यांना आरोप करण्याचे पैसे मिळाले आहेत का? मोदी सरकारच्या बाजूने मिलबेन का वक्तव्य का करत आहे? मोदींच्या भक्त असल्याने मेरी मिलबेन वक्तव्य करत आहे का? की भारतात करिअर करायचं म्हणून भाष्य करत आहे का? सिंगर मेरी किती श्रीमंत आहेत?

मेरी मिलबेन कोण आहेत? ( Mary Millben )

कॉक्रोच जनता पार्टी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाली आहे…पहिल्यावेळी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जेव्हा सीजेपीने आंदोलन पुकारलं होतं…त्यावेळी ते यशस्वी देखील झाले होते…पण यावेळी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे…दोन नेते जेलमध्ये गेल्यानंतर आता सीजेपीवर थेट अमेरिकेतून फंडिगंचा आरोप केला जात आहे….अमेरिकन सिंगरनेच असा दावा केल्याने आता एकच खळबळ उडाली आहे…खरंच सीजेपीला अमेरिकेतून फंडिग मिळत आहे का? हा तपासाचा भाग आहे…पोलीस प्रशासन लवकरच याचा तपास करतील असं वाटत आहे…पण दुसरा प्रश्न असा की या सिंगरला कसं कळालं की सीजेपीला अमेरिकेतून फंडिग होत आहे…भारत सरकारला, केंद्रीय तपास यंत्रणांना ही माहिती मिळाली नाही आणि सिंगरला कशी मिळाली…त्यामुळे भारतीय केंद्रीय तपास यंत्रणा काय करतात? त्यांना पुलवामाची माहिती मिळत नाही, पहलगामची माहिती मिळत नाही, त्यांना सीजेपीच्या फंडिंगची माहिती मिळत नाही…त्यांना कोणती माहिती मिळते असा प्रश्न नागरिक विचारताना दिसत आहे…

जर अमेरिकन फंडिंगची माहिती खोटी आहे, त्यामुळेच आपल्या भारतीय तपास यंत्रणांनी याची कोणतीही माहिती दिलेली नाही…तर अमेरिकन सिंगर यावर का भाष्य करत आहेत? सिंगरला कुणी बोलायला सांगितलं…असे काही प्रश्न निर्माण होत आहेत…पहिल्यांदा पाहू की या सिंगरचं आणि मोदी सरकारचं काय संबंध आहेत. आणि त्यानंतर त्यांची संपत्ती किती आहे….

हेही वाचा : Reliance Jio IPO 2026: देशातील सर्वात मोठ्या IPO ची तयारी; २१ ऑक्टोबरपासून गुंतवणुकीची संधी

मेरी मिलबेन आणि नरेंद्र मोदी यांची भेट ( Mary Millben Narendra Modi )

मेरी मिलबेन ( Mary Millben ) आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील या दृढ संबंधांची जागतिक स्तरावर सर्वात मोठी चर्चा जून २०२३ मध्ये झाली… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान वॉशिंग्टन येथील रोनाल्ड रेगन बिल्डिंगमध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते… या अधिकृत कार्यक्रमात मेरी मिलबेन यांनी भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ अत्यंत सुश्राव्य आणि भावपूर्ण आवाजात सादर केले… त्यांचे हे सादरीकरण ऐकून उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला होता… मात्र, या कार्यक्रमानंतर जे घडले, त्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले… राष्ट्रगीत संपल्यानंतर मिलबेन यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्याजवळ जाऊन अत्यंत आदरपूर्वक त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले… एका अमेरिकन गायिकेने भारतीय परंपरेचा मान राखत भारताच्या पंतप्रधानांबद्दल व्यक्त केलेला हा आदर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि भारत-अमेरिका संबंधांमधील एक भावनिक आणि ऐतिहासिक क्षण म्हणून याकडे पाहिले गेले… या प्रसंगानंतर मिलबेन यांनी स्पष्ट केले होते की, पंतप्रधान मोदी हे केवळ एका देशाचे नेते नसून ते जागतिक शांतता आणि प्रगतीचे दूत आहेत, म्हणूनच त्यांच्याबद्दल माझ्या मनात सर्वोच्च आदर आहे…

हा केवळ एका सांस्कृतिक कार्यक्रमापुरता मर्यादित असलेला आदर नव्हता, तर मिलबेन यांनी राजकीय आघाडीवरही मोदींच्या बचावासाठी नेहमीच तत्परता दाखवली आहे… ऑगस्ट २०२३ मध्ये जेव्हा भारतातील मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ सुरू होता आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर देशहिताला बाधा आणल्याचा आरोप केला होता… तेव्हा मेरी मिलबेन यांनी थेट अमेरिकेतून मोदींची पाठराखण केली… त्यांनी अधिकृतपणे प्रतिक्रिया देताना म्हटले की, भारताला आपल्या नेत्यावर पूर्ण विश्वास आहे… विरोधी पक्ष केवळ राजकीय फायद्यासाठी आवाज उठवत असून त्यात कोणतेही तथ्य नाही… पंतप्रधान मोदी हे मणिपूरमधील प्रत्येक नागरिकाला, विशेषतः महिला आणि माता-भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि ते नेहमीच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि अखंडतेसाठी लढत राहतील, अशी ग्वाही मिलबेन यांनी दिली होती… या विधानामुळे त्या केवळ एक गायिका नसून मोदींच्या विचारसरणीचा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय स्तंभ असल्याचे सिद्ध झाले.

मेरी मिलबेन यांच्या आरोपांमागे कोणते पुरावे आहेत?

मेरी मिलबेन यांच्या राजकीय वक्तव्यांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील टीकाही वारंवार दिसून येते.. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वक्षमतेवर थेट प्रश्न उपस्थित केले होते….एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राहुल गांधी हे भारताचं नेतृत्व करण्यासाठी योग्य व्यक्ती नसल्याचं मत व्यक्त केलं होतं… राहुल गांधी परदेशात जाऊन भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करतात, असा आरोपही मिलबेन यांनी केला होता… त्याच मुलाखतीत त्यांनी मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आणि भारत-अमेरिका संबंधांबाबत मोदींच्या भूमिकेचं समर्थन केलं…

पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ मिलबेन यांचे हे प्रयत्न केवळ राजकीय विधानांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत…तर भारताच्या आर्थिक आणि डिजिटल प्रगतीमध्ये अडथळा आणू पाहणाऱ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही त्या बारीक लक्ष ठेवून असतात… नुकत्याच समोर आलेल्या घडामोडींनुसार, ऑक्टोबर 2026 च्या सुरुवातीला जेव्हा जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ या सॅटेलाइट इंटरनेट सेवेला भारतात परवाना मिळण्याबाबत काही चर्चा आणि वाद सुरू होते…तेव्हा मिलबेन यांनी थेट मस्क यांनाच सल्ला दिला… राहुल गांधी यांच्या कोणत्याही वक्तव्याला किंवा सल्ल्याला महत्त्व न देता मस्क यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारशी संवाद साधावा… कारण यशस्वी जागतिक व्यवसाय करण्यासाठी भारताच्या अधिकृत नेतृत्वाचा आदर करणे आवश्यक आहे, असे त्यांनी मस्क यांना स्पष्ट केले… राहुल गांधी भारताच्या प्रगतीमध्ये आणि डिजिटल क्रांतीमध्ये केवळ अडथळे आणण्याचे काम करू शकतात, त्यामुळे मस्क यांनी थेट मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारशी भागीदारी करावी, असा सल्ला त्यांनी दिला होता…त्यामुळे त्या मोदींच्या किती भक्त आहेत, यातून दिसते, असं म्हटलं जात आहे…

 

Marry

हेही वाचा : पुन्हा एक पेपर फुटला? माथाडी कामगार परीक्षेत घोटाळा ?

CJP ला अमेरिकेतून फंडिंग मिळत असल्याचा दावा काय? ( CJP Funding )

या संपूर्ण प्रकरणात आणखी एक प्रश्न उपस्थित होत आहे… मेरी मिलबेन या पंतप्रधान मोदींच्या समर्थक असल्यामुळे सीजेपीवर आरोप करत आहेत का? किंवा त्यांना असे आरोप करण्यासाठी कुणाकडून पैसे दिले जात आहेत का? तर त्या मोदींच्या समर्थक असल्याने आरोप करत आहे का, हे आपल्याला दावा करून सांगता येणार नाही…तसंच त्यांना पैसे मिळाले आहेत का? याचेही उत्तर आपण थेट देऊ शकत नाही…कारण त्यांनी हे वक्तव्य का केले, हे तर त्यांनाच माहिती आणि दुसरा भाग म्हणजे तपासातून सत्य समोर येऊ शकतं…

मेरी मिलबेन किती श्रीमंत आहेत? ( Mary Millben Net Worth )

अमेरिकन गायिका मेरी मिलबेन ( Mary Millben ) यांची नेमकी संपत्ती किती आहे, याबाबत अधिकृत आणि विश्वसनीय आकडेवारी सार्वजनिकरीत्या उपलब्ध नाही…मात्र त्या 30 ते 40 कोटी रूपयांच्या मालकिण असू शकतात असं म्हटलं जात आहे…त्या आता पारंपरिक पॉप गायिका किंवा चित्रपटसृष्टीतील मुख्य प्रवाहातील कलाकार म्हणून काम करत नाही… राष्ट्रगीत, देशभक्तिपर गीतं आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रमांमधील सादरीकरणांसाठी विशेष ओळखल्या जातात…त्यामुळे त्यांची कमाई जास्त होत नसल्याची चर्चा आहे….भारतात प्रसिद्धी मिळावी म्हणून त्या भारतातील घडामोंडीवर वक्तव्य करत असतात, असं म्हटलं जात आहे…

ऑगस्ट 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांना भारत सरकारच्या निमंत्रणावर भारतात सादरीकरण करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर जून 2023 मध्ये नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यावेळी त्यांनी भारतीय राष्ट्रगीत सादर केलं… सप्टेंबर 2023 मध्ये भारतातील जी-20 शिखर परिषदेशी संबंधित कार्यक्रमातही त्यांचा सहभाग होता. या कार्यक्रमांमुळे भारतीय प्रेक्षकांमध्ये त्यांची ओळख वाढली. त्यामुळे भारतातील लोकप्रियता त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठी उपयुक्त ठरू शकते…आता मेरी मिलबेन यांनी केलेल्या दाव्याचा अमेरिकन सरकार चौकशी करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts