Hormuz Ship Sinking : होर्मुजची समुद्रधुनी काही महिन्यापूर्वी कुणालाही माहिती नव्हती…पण इराणने हार्मुजच्या समुद्रधुनीला रोखत थेट अमेरिकेला गुडघ्यावर आणले आणि आज जगभरात होर्मुजच्या सामुद्रधुनी चांगलीच चर्चेत आहे…आता याच समुद्रधुनीत चक्क आयफोन तरंगताना दिसत आहे…आणि आयफोन घेण्यासाठी चक्क लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे… व्हिडिओमुळे होर्मुजच्या सामुद्रधुनीत नेमकं काय घडलं, समुद्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर आयफोन कुठून आलेत…इराणने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे का? आखाती देशातील यु्द्ध कधी संपणार आहे?
होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ नेमकं काय घडलं? ( Hormuz Ship Sinking )
संयुक्त अरब अमिरातीच्या मालकीचे आणि सिंगापूरचा ध्वज असलेले ‘जीएफएस फ्राईड’ हे अवाढव्य कंटेनर जहाज समुद्रातून जात होते…दुबईहून माल घेऊन निघालेल्या या जहाजात अचानक स्फोट झाला…आणि काही वेळातच जहाजावरील शेकडो कंटेनर्स फुटले आणि त्यातील हजारो महागडे आयफोन्स तसंच आंतरराष्ट्रीय ब्रँडचे लक्झरी परफ्यूमचे खोके थेट समुद्राच्या पाण्यावर तरंगताना दिसले….इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने हे जहाज समुद्रातील माईनला धडकल्यामुळे बुडाल्याचा दावा केला …. मात्र, सागरी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जहाजाला अज्ञात प्रक्षेपणास्त्रचा फटका बसलाय… त्यामुळे जहाज नेमकं माईनमुळे बुडालं की दुसऱ्या हल्ल्यामुळे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही…
सुमारे 2800 हून अधिक कंटेनर्स वाहून नेण्याची क्षमता असलेले हे जहाज दुबईच्या प्रसिद्ध लॉजिस्टिक हबमधून निघून आपला प्रवास करत होते… जहाजावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि इतर मौल्यवान व्यापारी साहित्याने भरलेले हजारो कंटेनर्स लादलेले होते… ओमानच्या किनारपट्टीजवळ हे जहाज आले असता ही घटना घडली…घटनेची माहिती मिळताच सिंगापूरच्या सागरी प्राधिकरणाने तत्परतेने धोक्याचा इशारा मिळताच बचाव मोहीम राबवून जहाजावरील सर्व 21 कर्मचाऱ्यांना वेळेत सुखरूप बाहेर काढले, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली…
हेही वाचा : Tesla Roadster Car : एलॉन मस्क यांची उडणारी कार?
होर्मुजच्या समुद्रात आयफोनचे बॉक्स? ( iPhones Floating in Sea )
महागडे इलेक्ट्रॉनिक साहित्य, आयफोन आणि लक्झरी परफ्यूम पाण्यावर कचऱ्यासारखे तरंगाताना दिसले…याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे…व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोक छोट्या बोटींमधून आयफोन घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे…थेट समु्द्रात जाऊन बोटीमधून समुद्रात पडलेले महागडे आयफोन मिळवण्यासाठी लोकांची धडपड झाली…एकीकडे समुद्रात तणावाचे वातावरण आहे…इराण आणि अमेरिका समुद्रात समुद्रधुनीवरून आमने-सामने आलेले आहे…यातच नागरिक थेट आयफोन घेण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून आयफोन मिळवण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत…
सध्या आयफोन 18 लॉन्च झालेला आहे…या आयफोनची किंमत मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे…भारतात तर प्रमियम आयफोन कारच्या किंमतीच्या बरोबर पाहायला मिळत आहे…नागरिकांना काहीही करून आयफोन मिळवायचे आहे…समुद्राच्या पाण्यात हजारो पांढऱ्या रंगाचे आयफोनचे खोके तरंगत असल्याचे दृश्य पाहून स्थानिक मच्छिमार थक्क झाले आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याची माहिती आहे… बघता बघता लोकांनी आपापल्या मासेमारीच्या छोट्या बोटी आणि स्पीड बोट्स बाहेर काढल्या आणि थेट होर्मुज खाडीच्या दिशेने धाव घेतली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये लोक पाण्यातून आयफोनचे खोके हाताने आणि जाळ्यांच्या साहाय्याने भरभरून बोटीत टाकताना दिसत आहेत… काही बोटी तर आयफोनच्या बॉक्सने काठोकाठ भरल्या होत्या… मोफत मिळणाऱ्या या संपत्तीची लूट करण्यासाठी समुद्रात अक्षरशः बोटींची ट्रॅफिक जाम झाली होती…या भीषण परिस्थितीत त्या जहाजावरील लोकांची मदत करण्याऐवजी, आयफोन उचलून असंवेदनशीलता दाखवत असल्याची टीका होत आहे…
हेही वाचा : अंबानींचा Jio IPO येतोय! Jio IPO मध्ये पैसा लावावा का? गुंतवणुकीआधी हे जाणून घ्या
इराण-अमेरिका संघर्षाचा सागरी व्यापारावर परिणाम ( Iran US Conflict )
या जहाजाला जलसमाधी नेमकी कशामुळे मिळाली असा प्रश्न निर्माण झालाय…तर यावरून आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा यंत्रणा आणि इराणच्या प्रशासनामध्ये कमालीचे मतभेद पाहायला मिळत आहेत… इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी दावा केला आहे की या जहाजाने परवानगीशिवाय धोकादायक मार्ग निवडल्यामुळे ते समुद्रातील बारूदी सुरुंगाला धडकले… याउलट, आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा मॉनिटर्सच्या मते या जहाजावर अज्ञात ड्रोन किंवा क्षेपणास्त्राने हल्ला केला असण्याची शक्यता आहे… जहाज पाण्यात बुडत असताना त्यावर घट्ट बांधलेले शेकडो कंटेनर्स तुटून समुद्रात कोसळले आणि फुटले. यामध्ये हजारो नवीन आयफोन्सचे सीलबंद बॉक्स असल्याने ते पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागले…
या अपघातामुळे केवळ कोट्यवधी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचे नुकसान झाले नाही, तर समुद्रात तरंगणाऱ्या कंटेनर्समुळे या मार्गावरील इतर जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. जगातील २० ते ३० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गाने होत असल्याने, या अपघातामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भू-राजकीय तणाव आणि सागरी विम्याचे दर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे… जागतिक पातळीवर सुरक्षित सागरी व्यापाराच्या सुरक्षेवर या घटनेने मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.








