• Home
  • संस्कृती
  • Marigold Flower Demand Dussehra 2026 : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना मोठी मागणी; दरांमध्ये होऊ शकते उच्चांकी वाढ
ऍग्रो स्पेशल

Marigold Flower Demand Dussehra 2026 : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना मोठी मागणी; दरांमध्ये होऊ शकते उच्चांकी वाढ

Marigold Flower Demand Dussehra 2026
34

Marigold Flower Demand Dussehra 2026 : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात झेंडूच्या फुलांच्या मागणीत वाढ झाली असून  मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होत आहे. १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी बाजारात सुमारे २०० ते ३०० टन झेंडूची फुले दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, वाढती मागणी आणि पुरवठ्यातील चढ-उतार यामुळे फुलांच्या दरांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो ३० ते ७० रुपयांपर्यंत दर नोंदवले गेल्याचे वृत्त असून, फुलांची गुणवत्ता आणि बाजारातील परिस्थितीनुसार दर बदलू शकतात.

दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यामध्ये झेंडूच्या फुलांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. दसऱ्याच्या सणाला झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असते. यावेळी फुलांचे हार, तोरणे आणि पूजेसाठी झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो. तसेच वाहनांच्या सजावटीसाठीही फुलांचा वापर केला जातो. भारतीय सणांच्या निमित्ताने फुलांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील फुलबाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. घरगुती पूजा, मंदिरांची सजावट आणि व्यावसायिक सजावटीसाठी फुलांचा वापर केला जात असल्याने त्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते.

महाराष्ट्रातील दुष्काळाचा परिणाम फुलशेतीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे फुलांच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा फटका ग्राहकांच्या खिशाला बसणार असून, फुलांसाठी जास्तीचे पैसे (rate)  मोजावे लागू शकतात. या काळात फुलांच्या बाजारपेठांमध्ये फुलांना चांगला दर मिळाल्यास फुल उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्यास मदत होईल. असे असले तरी प्रत्यक्ष फायदा हा फुलांची आवक, मध्यस्थ विक्रेते, उत्पादन खर्च आणि बाजारातील विक्रीदरावर अवलंबून असतो. १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी बाजारात सुमारे २०० ते ३०० टन झेंडूची फुले (Marigold Flower) दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे

हेही वाचा : स्वस्तात मस्त शॉपिंग! गणपती असो वा दिवाळी, मुंबई-पुणेकरांसाठी ‘हे’ मार्केट ठरतंय खास!

फुलांच्या दरांची (Flowers Price) किंमत विविध निकषांवर अवलंबून असते. विशेषतः बाजारातील फुलांची आवक आणि ग्राहकांकडून असलेली मागणी यांवर किंमत ठरते. घाऊक बाजारात प्रतिकिलो ३० ते ७० रुपयांपर्यंत दर नोंदवले गेल्याचे वृत्त असून, फुलांची गुणवत्ता आणि बाजारातील परिस्थितीनुसार दर बदलू शकतात. बाजारपेठेतील वाढलेल्या दरांचा परिणाम दसऱ्यासाठी फुले, हार आणि तोरणे खरेदी करताना ग्राहकांना मोजाव्या लागणाऱ्या पैशांवर आणि एकूण खर्चावर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. दसऱ्याच्या काळात (Dussehra) फुलांच्या व्यापारात वाढ झाल्यामुळे फुलविक्री व्यवसायाला चालना मिळू शकते. मात्र, बाजारातील आवक आणि विक्रीवरच व्यापाराची उलाढाल अवलंबून असते.

भारतीय सणासुदीच्या (Indian Festival) दिवसांत पूजेसाठी ताज्या, आकर्षक आणि विविध रंगांच्या झेंडूच्या तसेच इतर फुलांना ग्राहकांकडून पसंती दिली जाते. फुलांची गुणवत्ता आणि रंगानुसारही त्यांच्या दरांमध्ये फरक आढळतो. त्यामुळे फुलांच्या किमती आणि मागणीवर परिणाम होतो. दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रातील विविध लहान-मोठ्या बाजारपेठांमध्ये झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. या मागणीनुसार होणाऱ्या आवकेचा बाजारभावावर नेमका काय आणि कसा परिणाम होईल, याकडे शेतकरी, फुल उत्पादक, व्यापारी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Amazon Flipkart Sale 2026: ऑनलाइन शॉपिंगचा महाधमाका! Sale कधी सुरू? कोणत्या वस्तूंवर मोठे Discount?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts