Budget Shopping in Mumbai Pune: गणपती असो वा दिवाळी, सणासुदीच्या खरेदीसाठी मुंबई- पुणेकरांची लगबग सुरू होते. कपडे, सजावटीच्या वस्तू आणि इतर साहित्य बजेटमध्ये खरेदी करायचं असेल, तर मुंबई- पुणेतील ‘हे’ तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतं.
गणपती, दसरा असो वा दिवाळी, सणासुदीच्या खरेदीसाठी (festival shopping) मुंबई- पुणेकरांची ( Pune- Mumabi) लगबग सुरू होते. कपडे, सजावटीच्या वस्तू आणि इतर साहित्य बजेटमध्ये खरेदी करायचं असेल, तर मुंबई-पुण्यातील काही बाजारपेठा तुमच्यासाठी खास ठरू शकतात. तुळशीबागपासून(Tulshibaug Market) दादर मार्केटपर्यंत(Dadar Market) , जाणून घ्या स्वस्तात मस्त शॉपिंगची ठिकाणं (shopping places Mumbai Pune).
पुण्यातील तुळशीबाग (Tulshibaug market Pune)
पुण्यात शॉपिंग म्हटलं की सर्वात आधी नाव येतं ते तुळशीबागेचं. कपडे, दागिने, बॅग्स, घरगुती वस्तू, सजावटीचं साहित्य आणि सणासुदीच्या विविध वस्तू येथे मिळतात. गणेशोत्सव आणि दिवाळीच्या काळात या परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळते. विशेष म्हणजे वेगवेगळ्या किमतींचे पर्याय उपलब्ध असल्याने आपल्या बजेटनुसार खरेदी करता येते.
रविवार पेठ (Raviwar Peth shopping)
पुण्यातील रविवार पेठ ही घाऊक आणि किरकोळ खरेदीसाठी ओळखली जाते. कपडे, कापड, सणासाठी लागणाऱ्या वस्तू आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी अनेक ग्राहक या भागात येतात. एकाच वस्तूचे वेगवेगळे पर्याय आणि दुकानांमधील किंमतींची तुलना करून खरेदी केल्यास बजेटमध्ये चांगली शॉपिंग करता येऊ शकते.
एफसी रोड (FC Road shopping Pune)
तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेला एफसी रोड हा कपडे, फॅशन अॅक्सेसरीज, पादत्राणे आणि विविध छोट्या-मोठ्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. सणासाठी पारंपरिक आणि मॉडर्न लूकचा मेळ साधायचा असेल, तर या परिसरात अनेक पर्याय मिळतात.
कॅम्प मार्केट (Camp market Pune)
पुण्याच्या कॅम्प परिसरातही विविध प्रकारची शॉपिंग करता येते. कपडे, फॅशन वस्तू, खाद्यपदार्थ आणि घरगुती वस्तूंसाठी येथे अनेक दुकानं आहेत. सणासुदीच्या काळात या भागात खरेदीची विशेष लगबग पाहायला मिळते.
पिंपरी मार्केट (Pimpri market shopping)
पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी पिंपरी मार्केट हा बजेट शॉपिंगचा लोकप्रिय पर्याय आहे. कपडे, घर सजावटीचं साहित्य, पूजा साहित्य आणि इतर सणोपयोगी वस्तूंसाठी येथे अनेक पर्याय मिळतात.
मुंबईतील दादर मार्केट (Dadar market Mumbai)
मुंबईत सणासुदीच्या शॉपिंगसाठी दादर मार्केट ( Dadar market) हा महत्त्वाचा पर्याय मानला जातो. दादर परिसरात कपडे, साड्या, मुलांचे कपडे, सजावटीच्या वस्तू, पूजा साहित्य आणि फुलांपासून अनेक वस्तू उपलब्ध होतात.
गणेशोत्सवाच्या काळात या बाजारपेठेत विशेष गर्दी पाहायला मिळते. गणपतीची सजावट, पूजा साहित्य आणि फुलांच्या खरेदीसाठी मुंबईच्या विविध भागांतून नागरिक दादरमध्ये येतात.
बार्गेनिंग केल्यास होऊ शकते बचत
या बाजारपेठांमध्ये खरेदी करताना बार्गेनिंग केल्यास काही वस्तू आणखी कमी किमतीत मिळण्याची शक्यता असते. मात्र प्रत्येक वस्तूच्या गुणवत्तेची आणि किमतीची तुलना करूनच खरेदी करणे योग्य ठरेल. सणासुदीच्या काळात गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने खरेदीसाठी शक्यतो वेळेचं नियोजन करून जाणं फायदेशीर ठरू शकतं.
मग शॉपिंग कुठे करणार?
मुंबई असो वा पुणे, सणासाठीची खरेदी बजेटमध्ये करायची असेल तर या बाजारपेठांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुळशीबाग, रविवार पेठ, एफसी रोड, कॅम्प, पिंपरी मार्केट आणि दादर मार्केट यापैकी तुमच्या सोयीचं ठिकाण निवडून सणाची शॉपिंग करता येईल.



