Mohan Bhagwat: आज २० ऑक्टोबर विजयादशमीच्या निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वदेशी, संस्कार, सोशल मीडिया आणि अमली पदार्थांसह विविध विषयांवर भाष्य करत समाजासमोर पाच महत्त्वाचे मुद्दे मांडले.
Mohan Bhagwat Speech Vijayadashami 2026: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ( RSS) शताब्दी वर्षानिमित्त आयोजित विजयादशमी (Vijayadashami 2026) उत्सवात सरसंघचालक मोहन भागवत ( Mohan Bhagwat ) यांनी समाजाला स्वदेशी, सांस्कृतिक मूल्यांचे जतन, सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. बदलत्या काळात विवेकपूर्ण जीवनशैली स्वीकारण्याचे (RSS Vijayadashami Speech) आवाहन करताना त्यांनी सोशल मीडिया, ओटीटी आणि अमली पदार्थांच्या वाढत्या प्रभावाबाबतही चिंता व्यक्त केली.
हेही वाचा: BCCI ची मोठी घोषणा! आता १४४ विकेट्स घेणाऱ्या माजी फिरकीपटूवर टीम इंडियाच्या निवडीची धुरा?
स्वदेशी आणि स्वबोधाचा स्वीकार आवश्यक
आपल्या भाषणात भागवत यांनी भारताची ओळख विविधतेत एकात्मता सुधारणाच्या संस्कृतीमुळे असल्याचे सांगितले. समाजाने स्वतःच्या संस्कृतीची जाणीव ( स्वबोध ) कायम ठेवत स्वदेशीचा स्वीकार दैनंदिनजीवनाचा भाग बनवावा, असे त्यांनी नमूद केले. संघाच्या शताब्दी वर्षात सुरू करण्यात आलेले परिवर्तनवादी उपक्रम समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वयंसेवक प्रयत्नशील राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संतांच्या विचारांचे स्मरण
भागवत यांनी संत रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंती वर्षाचा उल्लेख करत त्यांच्या समता, भक्ती आणि सामाजिक ऐक्याच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच स्वामी श्रद्धानंद यांच्या बलिदानाचे शताब्दी वर्ष, स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि समाजसुधारक राजनारायण बसू यांच्या योगदानाचेही त्यांनी स्मरण केले.
विविधतेतून राष्ट्रीय एकात्मता
भारताची ताकद धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरांतील वैविध्यात असल्याचे सांगताना भागवत यांनी सर्व घटकांचा परस्पर सन्मान राखणे हीच भारतीय परंपरेची खरी ओळख असल्याचे म्हटले. काळानुरूप आवश्यक बदल स्वीकारण्याची वृत्ती समाजात कायम राहिली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडिया आणि ओटीटीबाबत व्यक्त केली चिंता
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यावरील माहितीचा विचारपूर्वक स्वीकार करणे आवश्यक असल्याचे भागवत म्हणाले. योग्य-अयोग्य यातील फरक ओळखण्याची क्षमता कमी होत असल्याने विशेषतः तरुण पिढीने विवेकाने निर्णय घेणे गरजेचे असल्याचा त्यांनी सल्ला दिला.
अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यावर भाष्य
युवकांमध्ये वाढणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यसनाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. कुटुंब, शाळा आणि समाजातून मिळणारे संस्कार अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे सांगत, व्यसनमुक्त आणि सुसंस्कारित समाज घडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.









