Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • पुण्यात LS मराठीच्या वतीने ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन; प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांच्या सुरांनी रंगणार सुरेल मैफल!
मनोरंजन

पुण्यात LS मराठीच्या वतीने ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन; प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांच्या सुरांनी रंगणार सुरेल मैफल!

LS Marathi Diwali Pahat 2026
8

LS Marathi Diwali Pahat 2026 : दिवाळीच्या मंगलमय वातावरणात संगीताचा सुरेल आनंद देण्यासाठी LS मराठीच्या वतीने पुण्यात ‘दिवाळी पहाट’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६:३० वाजता बाणेर येथील बंटारा भवन येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे (sawani shende) यांच्या अभिजात स्वरांची मैफल रंगणार आहे.

प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे यांच्या सुरांनी रंगणार दिवाळी पहाट

‘सुरांची मैफल, दिव्यांचा लखलखाट… आपल्या सोबतीने उजळू दे यंदाची दिवाळी पहाट!’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संगीतप्रेमींना सुरेल गीतांचा आनंद घेता येणार आहे. दिवाळीच्या प्रसन्न सकाळी संगीत आणि उत्सवी वातावरणाचा सुंदर संगम अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन LS मराठीच्या वतीने करण्यात आले आहे.

‘तुमची उपस्थिती हीच आमच्यासाठी मोलाची भेट ठरणार, आपल्या सहवासाने सुरेल दिवाळी पहाट उजळणार!’ असा संदेश देत आयोजकांनी सर्व संगीतप्रेमींचे या कार्यक्रमासाठी हार्दिक स्वागत केले आहे.

हेही वाचा : Dhantrayodashi 2026 : धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरींची पूजा का करतात? आरोग्य, आयुर्वेद आणि समुद्रमंथनाशी खास नाते जाणून

कार्यक्रमाची माहिती (LS Marathi Diwali Pahat 2026)

  • कार्यक्रम: LS मराठी आयोजित दिवाळी पहाट

  • प्रमुख कलाकार: प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे

  • दिनांक: रविवार, ८ नोव्हेंबर २०२६

  • वेळ: सकाळी ६:३० वाजल्यापासून

  • स्थळ: बंटारा भवन, बाणेर, पुणे

  • प्रवेश: विनामूल्य

  • संपर्क: ७०२८६५५४४६ / ७०२८६६६२९१

सुरांची मैफल, दिव्यांचा लखलखाट आणि आनंदाची उधळण अनुभवण्यासाठी LS मराठीच्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts