Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • Gokul chairmanship Election : गोकुळचा अध्यक्ष उद्याच ठरणार! औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वाचा आदेश; चार शासकीय सदस्यांच्या मतांचे काय?
राजकारण

Gokul chairmanship Election : गोकुळचा अध्यक्ष उद्याच ठरणार! औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वाचा आदेश; चार शासकीय सदस्यांच्या मतांचे काय?

Gokul chairmanship Election
12
Gokul chairmanship Election : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक १० नोव्हेंबरला होणार! चार शासकीय सदस्यांनाही मतदानाची परवानगी, मात्र त्यांची मते स्वतंत्र ठेवण्याचे हायकोर्टाचे आदेश. नेमका निर्णय काय?

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेल्या सत्तासंघर्षात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आज महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. समविचारी आघाडी आणि राज्य सरकारच्या वतीने सुमारे २ ते ३ तास जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणीनंतर अध्यक्षपदाची निवडणूक न्यायालयाने यापूर्वी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसारच घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Gokul Election Court Decision)

चार शासननियुक्त सदस्यांच्या मतांबाबत महत्त्वाचे निर्देश

गोकुळ दूध संघावर चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या अध्यादेशाला समविचारी आघाडीकडून न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या सुनावणीत निवडून आलेल्या २५ संचालकांमधूनच अध्यक्षपदाची निवड व्हावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. दुसरीकडे, राज्य सरकारने अध्यादेशाचे समर्थन करत तो केवळ गोकुळ दूध संघासाठी नसून राज्यातील मोठ्या सहकारी संस्थांसाठी असल्याची भूमिका मांडली. मात्र, औरंगाबाद खंडपीठाकडून उद्या निवडणुक घेण्याचे आदेश दिले असून न्यायालयीन निर्देशांनुसार चार शासननियुक्त सदस्यांची मते अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील निवडून आलेल्या संचालकांच्या मतांपासून स्वतंत्र ठेवली जाणार आहेत. (gokul milk election update)

१० नोव्हेंबरला अध्यक्षपदाची निवड

यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने गोकुळच्या अध्यक्षपदासाठी १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सभा घेण्याचे निर्देश दिले होते. या सभेसाठी संघाच्या सर्व २५ निवडून आलेल्या संचालकांना नोटीस बजावण्याचे आदेशही देण्यात आले होते. आता न्यायालयीन सुनावणीनंतर ही निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याने गोकुळच्या अध्यक्षपदाचा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. (Chairmanship)

हेही वाचा :   Gokul Milk Union : गोकुळच्या सत्तासंघर्षाचा फटका ५ लाख दूध उत्पादकांना बसणार? ४,१८५ कोटींच्या संघात राजकारणाचा नेमका परिणाम काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts