मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
महापौर कार्यालय, विमानतळ आणि काही बँका लक्ष्यावर असल्याचा ई-मेलमध्ये उल्लेख आहे.
धमकीनंतर संबंधित ठिकाणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
Mumbai Bomb Threat : मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. महापौर कार्यालय, विमानतळ आणि बँकांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. (Email)
मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे. या ई-मेलमध्ये मुंबई महापौर कार्यालयासह शहरातील बँका, न्यायालये, अमिताभ बच्चन यांचा बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाचाही उल्लेख असल्याने पालिका प्रशासनाने खबरदारी घेत सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले. (BMC)
धमकीच्या ई-मेलमध्ये महापौर कार्यालयाचा उल्लेख असल्याने मुंबई महानगरपालिकेच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. संबंधित ठिकाणी तपासणी करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा यंत्रणांनी परिसराची पाहणी केली. मात्र, तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याची माहिती समोर आली आहे. (Mayor Office)
विमानतळापासून अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यापर्यंत उल्लेख
धमकीच्या मेलमध्ये मुंबईतील अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांचा उल्लेख आहे. यामध्ये बँका, न्यायालये, महालक्ष्मी रेसकोर्स, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचा समावेश आहे. (Amitabh Bachhan House)त्यामुळे संबंधित ठिकाणांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही यंत्रणांकडून खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, धमकीच्या ई-मेलचा स्रोत आणि त्यामागील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. तपास यंत्रणांकडून ई-मेलची सत्यता आणि धमकीची गांभीर्याने पडताळणी केली जात आहे. (Airport)
हेही वाचा : Maharashtra Court Bomb Threat : परभणी, सातारा, पुणे, पंढरपूरसह अनेक न्यायालयांना धमकीचे ई-मेल; प्रशासन सतर्क









