Maharashtra Rain Update 2026 : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे…शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे…शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने आणि बँकांकडून कर्ज घेऊन शेतात पेरणी केली होती…पिकं चांगल्या प्रकारे बहरू लागली..यामुळे शेतकरी आनंदात पाहायला मिळत होता…पण शेतकऱ्यांच्या याच आनंदाला जणू नजर लागलीये…
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारलीये….पाऊस बरसत नसल्याने सध्या पिकांना पावसाची प्रचंड गरज आहे….अनेक ठिकाणी तर पिकं सुकू लागली आहे…त्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे… सध्या शेतकऱ्यावर दुष्काळ सदृष्य परिस्थित निर्माण झालीये….पण अचानक पावसाने दडी का मारलीये असा प्रश्न सर्वच शेतकऱ्यांना निर्माण झालाय….शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले असताना पावसाचा एक थेंबही बरसताना दिसत नाहीये….महाराष्ट्रावर अल निनोचा संकट पाहायला मिळत आहे का? महाराष्ट्रात पाऊस कधी बरसणार? सरकार कृत्रिम पाऊस का पाडत नाही? असे काही प्रश्न निर्माण झालेय…
महाराष्ट्रात पावसाने दडी मारली; खरीप पिकांवर संकट ( Maharashtra Rain Update 2026 )
महाराष्ट्रात सुरूवातीला काही दिवस पावसाने दांडी मारली होती…पण काही दिवसानंतर पाऊस बरसला आणि शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली….पेरणी करताना देखील शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते की, अल निनोचं संकट असून भरपूर पाऊस पडल्यानंतरच पेरणी करायला हवी…शेतकऱ्यांनी जोरदार पाऊस पडल्यानंतरच पेरणी केली..पण शेतकऱ्यांना काय माहिती की ऑगस्ट महिन्यात पाऊसच बरसणार नाही….शेतकऱ्यांनी लाखो रूपये खर्च करून शेतात पेरणी केली…पण आता पावसाअभावी पिके वाळू लागलीये…शेतकऱ्यांचे फक्त खर्च केलेल्या लाखो रूपयांचेच नुकसान होणार नाही…तर या हंगामातील पिकं गेल्याने शेतकऱ्यांना याचाही लाखो रूपयांचा तोटा होणार आहे…म्हणजे शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन शेती केली, ते पैसे आणि हा हंगाम वाया गेल्याने यातून मिळणारे, असे दोन्ही पैसे वाया जाणार आहेत…
आता शेतकऱ्यांसमोर आपल्या मुलांची शाळेची फिस कशी भरायची? वर्षभर काय खर्च करायचे? घरातील कुणी आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये कसं न्यायचं? बँकाकडून किंवा सावकाराकडून घेतलेले पैसे परत कसे करायचे? पुढील हंगामात कुणाकडून पैसे कर्जाने घेऊन शेती करायची? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे…सध्याच्या दुष्काळ सदृष्य परिस्थितीमुळे फक्त एकच शेतकरी नाही, शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंबच अडचणीत आले आहे…अनेक शेतकऱ्यांसमोर जगावं कसं असा प्रश्न निर्माण झालाय…
हेही वाचा : गणपती मंडळांसाठी मोठी बातमी! राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी;
सोयाबीन आणि कपाशीला पावसाची गरज ( Khandesh Rain Update )
जुलै महिन्यातील चांगल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी अतिशय आत्मविश्वासाने शेतात खत व्यवस्थापन केले होते, काहींनी आंतरमशागतीची कामे पूर्ण केली होती… हा तो काळ असतो जेव्हा पिकांना, विशेषतः सोयाबीन आणि कपाशीला फुलधारणा किंवा शेंगा लागण्याची प्रक्रिया सुरू होते… या संवेदनशील काळामध्ये पिकांना पाण्याची सर्वात जास्त गरज असते… जर या काळात पिकांना पाणी मिळाले नाही, तर पिकांची वाढ खुंटते, फुले गळून पडतात आणि उत्पादनात तब्बल मोठी घट होण्याची भीती असते… आज महाराष्ट्रातील मराठवाड्यातील बीड, जालना, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये, तसेच खान्देशातील धुळे, जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगलीच्या काही भागांत विहिरींनी आणि कूपनलिकांनी तळ गाठला आहे…
धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे… ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, ते विजेच्या लपंडावाशी आणि कमी दाबाशी झुंज देत आपली पिके वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे… सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शेतकरी आकाशात येणाऱ्या पांढऱ्या-काळ्या ढगांकडे आशेने पाहत राहतो, पण रात्री कोरड्या हवेसह निघून जाणाऱ्या ढगांमुळे त्याच्या पदरी फक्त निराशाच पडते… बँकांकडून घेतलेले पीक कर्ज कसे फेडायचे, सावकाराचे पैसे कसे द्यायचे आणि पुढच्या वर्षभराचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेने शेतकऱ्याला ग्रासले आहे. अनेक भागांतून पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे…
Maharashtra Weather Update : अशा या भीषण आणि दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलाय की सरकार शेतकऱ्यांना वाचण्यासाठी कृत्रिम पाऊस का पाडत नाही…सरकारकडून कोट्यवधी रुपये इतर योजनांवर किंवा राजकीय जाहिरातींवर खर्च केले जातात, मग शेतकऱ्यांची पिके जळत असताना कृत्रिम पावसावर खर्च का केला जात नाही? असा प्रश्न निर्माण उपस्थित केला जात आहे… हा प्रश्न जितका भावनिक आणि रास्त वाटतो, तितकाच तो तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचा आणि आव्हानात्मक आहे… कृत्रिम पाऊस पाडणे ही केवळ आकाशात विमानाने फिरून रसायने फवारण्याइतकी सोपी गोष्ट नाही… हवामान शास्त्रज्ञांच्या मते, कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी काही अत्यंत कडक आणि विशिष्ट नैसर्गिक अटींची पूर्तता व्हावी लागते… आकाशात दिसणारे प्रत्येक ढग हे पाऊस पाडण्यास सक्षम नसतात… ढगांमध्ये पाण्याचे प्रमाण, म्हणजेच आर्द्रता किमान ७० ते ८० टक्क्यांच्या वर असावी लागते… जर आकाशात केवळ कोरडे ढग असतील, तर त्यावर कितीही प्रमाणात सिल्व्हर आयोडाइड किंवा सोडियम क्लोराईड फवारले, तरी त्यातून पावसाचा एक थेंबही पडणार नाही… याव्यतिरिक्त, ढगांची उंची, त्यांची घनता आणि ढगाच्या वरच्या भागातील तापमान उणे १० ते उणे १५ अंश सेल्सिअस असणे आवश्यक असते, तरच रसायनांची फवारणी केल्यावर पाण्याचे स्फटिकात रूपांतर होऊन पाऊस पडू शकतो….या प्रकियेसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च येतो…सरकार कृत्रिम पाऊस भीषण दुष्काळ, पिण्यासाठी पाणीच नाही, अशावेळी पाडते…
सोयाबीन, तूर, मूग आणि कापूस पिकांवर परिणाम ( Maharashtra Weather Update )
परभणी जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय… गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने सोयाबीन, तूर, मूग आणि कापूस पिकं उन्हामुळे सुकत आहेत… पेरणीसाठी कर्ज आणि उसने पैसे घेऊन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मोठं संकट उभं राहिलं आहे… या आठवड्यात पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यातील खरीप पिकं धोक्यात येण्याची शक्यता आहे….
या सर्व गंभीर संकटाच्या आणि तांत्रिक मर्यादांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाने आगामी काळात मोठ्या हवामान बदलाचे संकेत दिले आहेत… हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरामध्ये आता एक नवीन आणि अत्यंत तीव्र स्वरूपाची कमी दाबाची प्रणाली विकसित होत आहे. ही सिस्टीम मान्सूनच्या वाऱ्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे खेचून आणण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे…5 आणि 6 सप्टेंबर रोजी विदर्भ, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागांत, 7 ते 12 सप्टेंबरच्या कालावधीत मराठवाडा, खान्देश, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे….









