Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अंबानींच्या जिओची शेअर बाजारात लवकरच होणार ग्रँड एन्ट्री; ₹38 हजार कोटींच्या IPO ची तयारी, पाहा A टू Z माहिती
बिजनेस

अंबानींच्या जिओची शेअर बाजारात लवकरच होणार ग्रँड एन्ट्री; ₹38 हजार कोटींच्या IPO ची तयारी, पाहा A टू Z माहिती

Jio IPO
27
Jio IPO: मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील जिओ प्लॅटफॉर्म्सच्या बहुप्रतीक्षित IPO कडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. तब्बल ३८ हजार कोटींच्या या मेगा इश्यूमुळे भारतीय शेअर बाजारात नवा विक्रम होण्याची शक्यता आहे. IPO कधी येणार, किती शेअर्स मिळणार आणि गुंतवणूकदारांनी काय पाहावे, जाणून घ्या A टू Z माहिती.

भारतीय शेअर बाजारात मोठ्या कंपन्यांच्या IPO ची मालिका सुरू असताना आता रिलायन्स समूहातील आणखी एका महत्वाच्या कंपनीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी Jio Platform शेअर बाजारात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.

प्रस्तावित IPO चा आकार जवळपास 37,000 कोटी ते 38,000 कोटी असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा इश्यू प्रत्यक्षात आल्यास भारतीय प्राथमिक बाजारातील सर्वात मोठ्या IPO पैकी एक नव्हे, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Goa LPG Cylinder Scheme: गोव्यात मोठी खुशखबर! 3 गॅस सिलेंडरसाठी मिळणार 3000 रुपये; ”या’ तारखेपासून करता येणार अर्ज

सणासुदीच्या काळात जिओचा IPO?

जिओच्या IPO साठी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंतचा कालावधी महत्वाचा मानला जात आहे.

जिओच्या IPO साठी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंतचा कालावधी महत्त्वाचा मानला जात आहे. कंपनीकडून अद्याप अंतिम इश्यूची तारीख जाहीर झालेली नसली तरी नवरात्र किंवा दिवाळीच्या आसपास बाजारात प्रवेश करण्याची शक्यता चर्चेत आहे.

IPO ची तारीख निश्चित झाल्यानंतर कंपनीकडून संभाव्य गुंतवणूकदारांशी संवाद साधण्यासाठी रोडशो आणि इतर प्रचारात्मक उपक्रम सुरू केले जाऊ शकतात.

IPO साठी SEBI ची मंजुरी

जिओ प्लॅटफॉर्म्सने IPO प्रक्रियेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आधीच उचलले आहे. कंपनीने IPO संदर्भातील कागदपत्रे दाखल केली असून SEBI कडून 28 ऑगस्ट रोजी मंजुरी मिळाल्याचे वृत्त आहे. यामुळे आता बाजारातील पुढील लक्ष इश्यूची अंतिम तारीख, किंमतपट्टा आणि शेअर्सची संख्या यावर असेल.

किती पैसा उभारला जाणार?

बाजारातील अंदाजानुसार जिओच्या IPO मधून सुमारे ₹37,800 कोटी उभारण्याचे लक्ष्य असू शकते.

इश्यूचा अंतिम आकार याच पातळीवर राहिला, तर Hyundai Motor India च्या IPO चा आतापर्यंतचा विक्रम मागे पडू शकतो.

मोठ्या आकाराचा IPO असल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांसोबतच म्युच्युअल फंड, विमा कंपन्या आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचेही लक्ष या इश्यूकडे राहण्याची शक्यता आहे.

जिओ IPO इतका महत्त्वाचा का?

रिलायन्स जिओने भारतीय टेलिकॉम क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठा बदल घडवून आणला आहे. टेलिकॉमसोबतच कंपनीचा व्यवसाय डिजिटल सेवा, मनोरंजन, क्लाउड, तंत्रज्ञान आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंत विस्तारला आहे.

त्यामुळे IPO च्या माध्यमातून कंपनीचे स्वतंत्र बाजारमूल्य निश्चित होणे ही रिलायन्स समूहासाठीही महत्त्वाची घटना ठरू शकते.

मोठ्या IPO समोर जिओचे आव्हान

भारतीय बाजारात यापूर्वी LIC, Hyundai Motor India आणि Paytm सारख्या कंपन्यांचे मोठे IPO आले आहेत. प्रस्तावित आकाराच्या आधारावर जिओ त्यांच्यापेक्षा मोठा इश्यू घेऊन येऊ शकतो.

Jio Platforms* सुमारे ₹37,600 कोटी
NSE सुमारे ₹30,600 कोटी
Hyundai Motor India ₹27,870 कोटी
LIC ₹20,557 कोटी
One97 Communications ₹18,300 कोटी
Tata Capital ₹15,512 कोटी
Coal India ₹15,199 कोटी
Yes Bank ₹15,000 कोटी
LG India ₹11,607 कोटी

प्रस्तावित आकाराच्या अंदाजावर आधारित.

गुंतवणूकदारांसाठी खरी परीक्षा काय?

जिओ हे देशातील ओळखीचे नाव असले तरी IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी केवळ ब्रँडची लोकप्रियता पाहणे पुरेसे नाही.

सर्वप्रथम कंपनी किती valuation वर बाजारात येत आहे, हे तपासणे आवश्यक असेल. त्यासोबत कंपनीची कमाई, नफा, कर्ज, रोख प्रवाह आणि भविष्यातील विस्ताराच्या योजनांचा अभ्यास करावा.

टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा, ग्राहकांकडून मिळणारे सरासरी उत्पन्न, 5G व्यवसायाचा विस्तार आणि डिजिटल सेवांमधून होणारी वाढ हे देखील महत्त्वाचे घटक ठरतील.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts