Breaking News :
  • Home
  • Top News
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! CGHS पेंशनर कार्ड मिळवण्याची प्रक्रिया आता होणार सोपी; जाणून घ्या नवीन सुविधा
बिजनेस

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! CGHS पेंशनर कार्ड मिळवण्याची प्रक्रिया आता होणार सोपी; जाणून घ्या नवीन सुविधा

CGHS Pensioner Card

CGHS Pensioner Card: केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सीजीएचएस पोर्टलमध्ये ‘भविष्य पोर्टल’ जोडले आहे, जेणेकरून केंद्र सरकारी आरोग्य योजनेचे (सीजीएचएस) पेन्शनर कार्ड बनवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल.

या नवीन व्यवस्थेमुळे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनशी संबंधित माहिती पुन्हा भरावी लागणार नाही. पेन्शनची माहिती डिजिटल पद्धतीने थेट CGHS अर्ज प्रक्रियेत उपलब्ध होणार असल्याने वेळ आई कागदपात्रांची प्रक्रिया कमी होणार आहे.

हेही वाचा: पेपरफुटी प्रकरणांवर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले? वाचा

जुन्या पद्धतीने येत होत्या अडचणी

यापूर्वी कर्मचाऱ्यांना पेंशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर CGHS पेंशनर कार्डसाठी वेगळा अर्ज करावा लागत होता. त्यामुळे आधी दिलेली माहिती पुन्हा भरावी लागायची. त्यामुळे अर्ज प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागत होता आणि कागदपत्रांच्या तपासणीतही विलंब होत होता.

नवीन प्रणालीमुळे अर्ज होणार जलद

आता भविष्य पोर्टलवर पेन्शनशी संबंधित कागदपत्रांना मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित माहिती आपोआप CGHS पोर्टलवर हस्तांतरित होईल. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होणार आहे.

PAN कार्डचा होणार वापर

या नवीन डिजिटल प्रक्रियेमध्ये PAN कार्डचा वापर विशिष्ट ओळख म्हणून केला जाणार आहे. CGHS आणि भविष्य पोर्टलवरील माहितीची पडताळणी PAN च्या माध्यमातून केली जाईल.

यामुळे चुकीची माहिती, डुप्लिकेट नोंदी आणि प्रक्रियेतील त्रुटी कमी होण्यास मदत होईल.

CGHS कार्ड मिळवण्याची प्रक्रिया

नवीन प्रक्रियेनुसार

कार्यालयाकडून पेन्शन संबंधित कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर PPO (Pension Payment Order) जारी केला जाईल.
त्यानंतर कर्मचारी भारतकोष पेमेंट गेटवेद्वारे CGHS शुल्क ऑनलाइन भरू शकतील.
शुल्क भरल्यानंतर CGHS पेंशनर कार्ड तयार केले जाईल.

कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा

CGHS पेंशनर कार्ड मंजूर झाल्यानंतर कर्मचारी ते CGHS पोर्टल किंवा भविष्य पोर्टलवरून डाउनलोड करू शकतील.

जुन्या पद्धतीचा पर्याय कायम

आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, नवीन डिजिटल सुविधा ही अतिरिक्त पर्याय म्हणून उपलब्ध आहे. इच्छुक कर्मचारी पूर्वीप्रमाणे CGHS च्या वेबसाइटवरूनही अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

CGHS योजनेबद्दल जाणून घ्या

सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम (CGHS) ही केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील अनेक शहरांमध्ये लाखो लाभार्थी आरोग्य सेवांचा लाभ घेत आहेत.

CGHS अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा

बाह्यरुग्ण विभागातील (OPD) उपचार आणि औषधांची सुविधा
CGHS अंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये उपचार
मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये दाखल होऊन उपचार
डायग्नोस्टिक सेंटरमध्ये विविध तपासण्या
पेंशनर्ससाठी कॅशलेस उपचार सुविधा
आपत्कालीन परिस्थितीत नियमांनुसार उपचार खर्चाची परतफेड

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts