Breaking News :
  • Home
  • गुन्हा
  • नात्याला काळिमा! दिराकडून वहिनीची निर्घृण हत्या, मुलीसमोरच घडला प्रकार
गुन्हा

नात्याला काळिमा! दिराकडून वहिनीची निर्घृण हत्या, मुलीसमोरच घडला प्रकार

Bhandra Crime

Bhandara Crime: भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. दिरानेच वाहिनीची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका ३० वर्षीय महिलेची तिच्याच दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही हृदयद्रावक घटना मृत महिलेच्या लहान मुलीसमोरच घडल्याचे समोर आले असून आरोपी घटनेनंतर दुचाकीवरून फरार झाला आहे.

मृत महिलेची ओळख

मृत महिलेचे नाव माधुरी तुलसीदास अंबादे (३२, रा.ब्रह्यपुरी) असे आहे. आरोपी दिराचे नाव गौरव अंबादे (२५, रा. ब्रह्मपुरी) असे असून तो घटनेनंतर दुचाकीवरून फरार झाला आहे.

घटनेचा तपशील

माधुरी अंबादे आपल्या ८ वर्षीय मुलगी जानवी आणि दिर गौरव अंबादे यांच्यासोबत पालांदूर येथे एका लग्न समारंभासाठी आल्या होत्या. कार्यक्रमानंतर उशीर झाल्याने ते भागडी येथील नातेवाईकांकडे मुक्कामाला थांबले.

रात्रीच्या वेळी आरोपीने पुन्हा एकदा वहिनीशी लग्न करण्याची मागणी केल्याचे समोर आले आहे. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून संतापलेल्या आरोपीने धारदार शस्त्राने महिलेचा गळा चिरून तिची हत्या केली.

मुलीसमोर घडलेली घटना

घटनेच्या वेळी पीडितेची ८ वर्षीय मुलगी जवळच झोपलेली होती. तिला जाग आली असता तिने आरडाओरड केली. त्यामुळे आरोपी घाबरून दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाला.

पोलिसांची कारवाई

या प्रकरणी लाखांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts