• Home
  • गुन्हा
  • सराईत घरफोडी करणारा चोरटा अटकेत; 5 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त
Top News

सराईत घरफोडी करणारा चोरटा अटकेत; 5 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त

Housebreaker Arrested

Housebreaker Arrested : गेल्या काही महिन्यात यवतमाळ शहरातील विविध विभागात घरफोडी तसेच दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. या सराईत घरफोडी केलेल्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह विविध चोरीच्या वस्तू मिळून 5 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीने अवधुतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 6, लोहारा 2 आणि वसंतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 1 अशा एकूण नऊ घरफोड्या केल्याची कबुली दिली.

सापळा रच चोरट्याला अटक

जांब रोडवरील वन उद्यानाजवळ असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला याबाबत तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करत चोरटा अक्षय दयाराम मसराम याला अटक केली आहे. पोलिसांना चोरटा चांदीच्या वस्तू विक्री करण्याच्या उद्देशाने येत असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर पथकाने वन उद्यानाजवळ सापळा रच चोरट्याला शोधून अटक केली.

2 लाख 60 हजार 500 रुपये किंमतीचे 26.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने

या अक्षय दयाराम मसराम या चोरट्याकडून 2 लाख 60 हजार 500 रुपये किंमतीचे 26.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 30 हजार 608 रुपयांचे चांदीचे दागिने आणि 90 हजार रुपये किंमतीची दुचाकी, असा एकूण 3 लाख 81 हजार 108 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या चोरट्याला बाकीच्या मुद्देमालाबद्दल विचारपूस केली असता यवतमाळ शहर तसेच पुसद शहरातील वसंत नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या चोरीतील साहित्य घरात ठेवून असल्याची माहिती दिली.

हे ही वाचादिल्ली स्फोटाशी संबंधित अल-फलाह विद्यापीठावर EDची कारवाई, १४० कोटींची मालमत्ता जप्त

5 लाख 88 हजार 107 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात

यामध्ये 7 एलईडी आणि 1 सिलिंडर, असा एकूण 2 लाख 6 हजार 999 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीने अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 6 , लोहारा 2 आणि वसंतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 1, असे 9 गुन्हे उघडकीस आले. यात 9 गुन्ह्यातील 5 लाख 88 हजार 107 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाणे, पीआय सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनिष गावंडे, गजानन राजमल्लू, सय्यद साजिद, योगेश गटलेवार, प्रशांत हेडाऊ, रूपेश पाली, योगेश डगवार, सचिन घुगे, नीलेश राठोड, सुनील पैठणे, आकाश सहारे, देवेंद्र होले, आकाश सूर्यवंशी आदींनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts