Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी हत्याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिच्या आई-वडिलांनी दिल्लीत आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनस्थळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी भेट देत कुटुंबीयांना पाठिंबा दर्शवला.
Ankita Bhandari Murder Case: अंकिता भंडारी (Ankita Bhandari News) हत्याप्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. या प्रकरणात न्याय मिळावा आणि संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी (Ankita Bhandari Justice) करण्यात यावी, या मागणीसाठी अंकिताच्या आई-वडिलांनी दिल्लीतील इंडिया गेट परिसरात धरणे आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनामुळे उत्तराखंडमधील राजकीय वातावरणही पुन्हा तापलं आहे.
या प्रकरणाशी संबंधित आरोपांमुळे भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढल्याची चर्चा सुरू आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते दुष्यंत गौतम यांचं नावही या संदर्भात समोर आलं असून, त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल्याचं वृत्त आहे. दरम्यान, गौतम यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याने अंकिताच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. या नियुक्तीला विरोध दर्शवत त्यांनी दिल्लीमध्ये आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. ( LS Marathi News Channel )
अंकिताच्या कुटुंबीयांच्या मागण्यांना आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचाही पाठिंबा मिळाला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी बुधवारी, १४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी इंडिया गेट ( India Gate Protest ) येथे आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी अंकिताच्या आई-वडिलांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि आंदोलनाला ( Ankita Bhandari Parents Protest ) पाठिंबा व्यक्त केला.
हेही वाचा: या ५ राशींना मिळू शकते मोठी संधी; तर कोणत्या राशींनी घ्यावी काळजी? एकदा वाचा!
अंकिता भंडारी हत्याप्रकरणाला तीन वर्षांहून अधिक काळ उलटला असतानाही कुटुंबीयांकडून न्यायाची मागणी कायम आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि संबंधित प्रश्नांची स्पष्ट उत्तरं मिळावीत, अशी त्यांची भूमिका आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या भेटीमुळे या प्रकरणाने पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात लक्ष वेधून घेतलं आहे.









