शैक्षणिक बातम्या

CUET-UG 2026 परीक्षा पुढे ढकलली; नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

CUET UG 2026

CUET-UG 2026 Exam Postponed: CUET-UG परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने 28 मे 2026 रोजी नियोजित असलेल्या दोन्ही शिफ्टच्या परीक्षा तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

CUET-UG परीक्षेची तयारी करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) २८ मे २०२६ रोजी नियोजित असलेल्या दोन्ही शिफ्टच्या परीक्षा तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलल्या आहेत.

ही परीक्षा कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET-UG) अंतर्गत देशभरातील केंद्रीय आणि इतर विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते. बकरी ईद (ईद-उल-अजहा) च्या सुट्टीच्या तारखांमध्ये झालेल्या बदलांमुळे तसेच प्रशासकीय कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: थोडं-थोडं करून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; अवघ्या काही दिवसांत इंधन 7 रुपयांनी महाग

दोन्ही शिफ्टची परीक्षा स्थगित

NTA ने स्पष्ट केले आहे की २८ मे रोजी होणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही शिफ्टच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था आणि विद्यार्थ्यांची सोया लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन परीक्षा तारीख लवकरच जाहीर होणार

स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांसाठी सुधारित वेळापत्रक लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवीन तारखेसह प्रवेशपत्र (Admit Card) पुन्हा जारी केले जाईल.

विद्यार्थ्यांसाठी सूचना

NTA कडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे की त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. फक्त अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती तपासावी.

परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी प्रवेशपत्रासोबत वैध फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा शाळा/विद्यापीठ ओळखपत्र) आणि पासपोर्ट साइज फोटो बाळगणे अनिवार्य असेल.

महत्त्वाची माहिती

NTA ने स्पष्ट केले आहे की केवळ 28 मेची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून उर्वरित परीक्षा वेळापत्रकानुसारच घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी नियमित अपडेट तपासत राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts