शैक्षणिक बातम्या

SSC CGL ची तयारी करताय? मग ‘हे’ नवीन नियम आधी वाचाच; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

SSC CGL

SSC CGL New Rules: SSC CGL परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. यंदा या परीक्षेत महत्वाचे बदल करण्यात आला असून सेक्शनल टाइमिंगचा नवा नियम लागू करण्यात आला आहे. हा बदल उमेदवारांच्या वेळ व्यवस्थापनावर थेट परिणाम करणारा ठरू शकतो, त्यामुळे परीक्षा देण्यापूर्वी हे नियम जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

SSC CGL 2026 परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी यंदा एक मोठा बदल लागू करण्यात आला आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) परीक्षा पद्धतीत सेक्शनल टाइमिंगचा नवा नियम लागू केला असून याचा थेट परिणाम उमेदवारांच्या वेळ व्यवस्थापनावर होणार आहे. अनेक जण अजूनही या बदलाबद्दल अनभिज्ञ आहेत, पण हा नियम समजून न घेतल्यास परीक्षेत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे परीक्षा देण्यापूर्वी हे नवीन नियम जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.

हेही वाचा: ठाकरेंना मिळाला मोठा धक्का; 250 कार्यकर्त्यांसह बडा नेता मुंबईकडे रवाना, भाजपमध्ये होणार सामील

आता टियर-1 आणि टियर-2 या दोन्ही टप्प्यांमध्ये सेक्शननिहाय वेळ (Sectional Timing) अनिवार्य करण्यात आली आहे. म्हणजे प्रत्येक विषयासाठी ठराविक वेळ दिला जाईल आणि वेळ संपताच संबंधित सेक्शन आपोआप बंद होईल. त्यामुळे उमेदवारांसाठी वेळेचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://ssc.gov.in/login या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया 21 मेपासून सुरू झाली असून 22 जून 2026 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

टियर-1 परीक्षेची रचना

टियर-1 परीक्षा चार भागांमध्ये होईल

जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग
जनरल अवेअरनेस
क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड
इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन

प्रत्येक भागात २५ प्रश्न (५० गुण) असतील.
एकूण: १०० प्रश्न, २०० गुण
एकूण वेळ: १ तास

प्रत्येक सेक्शनसाठी १५ मिनिटे दिली जातील. वेळ संपल्यावर पुढील सेक्शन सुरू होईल.

टियर-2 परीक्षेची रचना

टियर-2 परीक्षा एकाच दिवशी दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. यातही सेक्शननिहाय वेळ लागू असेल.

सेक्शन 1

गणितीय क्षमता (Mathematical Ability)
रिझनिंग आणि जनरल इंटेलिजन्स
60 प्रश्न (180 गुण)
प्रत्येक विषयासाठी 30 मिनिटे

सेक्शन 2

इंग्रजी भाषा आणि समज (Comprehension)
जनरल अवेअरनेस
70 प्रश्न (210 गुण)
इंग्रजी: 40 मिनिटे
जनरल नॉलेज: 20 मिनिटे

सेक्शन 3

संगणक ज्ञान चाचणी
20 प्रश्न (60 गुण)
वेळ: 15 मिनिटे

सेक्शन 4

डेटा एंट्री स्पीड टेस्ट (DEST)
पेपर 2 आणि पेपर 3
पेपर 2 (सांख्यिकी): JSO आणि संबंधित पदांसाठी
100 प्रश्न, 200 गुण
वेळ: 2 तास
पेपर 3 (वित्त आणि अर्थशास्त्र): AAO आणि AEO पदांसाठी
100 प्रश्न, 200 गुण
वेळ: 2 तास

दोन्ही टप्प्यांमध्ये निगेटिव्ह मार्किंग लागू असेल.

एकूण पदसंख्या

SSC ने 21 मे रोजी विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये ग्रुप B आणि ग्रुप C मधील 12,256 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू: 21 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख: 22 जून 2026 (रात्री 11 वाजेपर्यंत)
फी भरण्याची अंतिम तारीख: 23 जून 2026
अर्ज दुरुस्ती कालावधी: 29 जून ते 1 जुलै 2026

परीक्षेच्या संभाव्य तारखा

टियर-1: ऑगस्ट–सप्टेंबर 2026
टियर-2: डिसेंबर 2026

निवड प्रक्रिया

प्रथम टप्पा: टियर-1 परीक्षा
द्वितीय टप्पा: टियर-2 परीक्षा
अंतिम निवड टियर-2 मधील गुण आणि उमेदवाराने दिलेल्या पोस्ट प्राधान्यानुसार (Post Preference) केली जाईल.
एकदा दिलेले पोस्ट प्राधान्य नंतर बदलता येणार नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts