• Home
  • मनोरंजन
  • अभिनेता धर्मेंद्र यांना होता हा त्रास; यापूर्वी देखील होते रुग्णालयात दाखल
Top News

अभिनेता धर्मेंद्र यांना होता हा त्रास; यापूर्वी देखील होते रुग्णालयात दाखल

dharmendra death

Dharmendra health issue : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झालं आहे. वयाच्या 89 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. “ही-मॅन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांच्या निधनानं देशभरात शोककळा पसरली आहे.धर्मेंद्र बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यांना काही दिवसांपासून मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं होतं, घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. ‘आयएएनएस’च्या वृत्तानुसार धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे, त्यांच्यावर अंत्यसंस्कार पवन हंस स्मशानभूमीत केले जाणार आहेत. धर्मेंद्र यांचे पूर्ण नाव धर्मेंद्र केवल कृष्ण देओल होतं. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील नसराणी गावात झाला.

धर्मेंद्र यांना होता श्वसनाचा त्रास :

धर्मेंद्र यांना 31 ऑक्टोबर 2025 रोजी नियमित तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. 10 नोव्हेंबर रोजी त्यांची प्रकृती बिघडली.
अशा स्थितीत त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचलं होतं. हेमा मालिनी, सनी देओल, ईशा देओल, करण देओल, राजवीर देओल आणि अभय देओल हे सर्वजण पोहोचले होते.

 

65 वर्षांची कारकीर्द :

1960 मध्ये “दिल भी तेरा हम भी तेरे” या चित्रपटातून धर्मेंद्र यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 1961 मध्ये आलेल्या “बॉयफ्रेंड” या चित्रपटात ते सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले.
धर्मेंद्र 65 वर्षे अभिनयात सक्रिय राहिले, त्यांनी असंख्य हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्यांनी शोले (1975), चुपके चुपके (1975), सीता और गीता (1972), धरमवीर (1977), फूल और पत्थर (1966), जुगनू (1973), आणि यादों की बारात (1973) यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं.

धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट :

धर्मेंद्र 89 व्या वर्षीही काम करत होते. त्यांच्या निधनानंतर, त्यांचा शेवटचा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे. धर्मेंद्र यांनी “21” या चित्रपटात भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ते अगस्त्य नंदाच्या
वडिलांची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 25 डिसेंबर 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts