• Home
  • मनोरंजन
  • व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर येणार ‘लग्नाचा शॉट’; प्रियदर्शनी-अभिजितची जोडी करणार धूम
मनोरंजन

व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर येणार ‘लग्नाचा शॉट’; प्रियदर्शनी-अभिजितची जोडी करणार धूम

Priyadarshini and Abhijit in Marathi film Lagnacha Shot releasing on Valentine’s Day

Lagnacha Shot movie release date : लवकरचलग्नाचा शॉटहा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नुकतेच नवीन पोस्टर प्रदर्शित झाले. याशिवाय या पोस्टर सोबतच मुख्य कलाकार कोण असणार याची देखील माहिती मिळाली.

नवीन कलाकारांना संधी

आगामी लग्नाचा शॉट हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटात प्रियदर्शनी इंदलकर आणि अभिजित आमकर यांची मुख्य भूमिका असणार आहे. या पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून चित्रपटात नेमकं काय असेल याबाबत आता चित्रपटाच्या नावावरून आणि पोस्टर वरून चित्रपट प्रदर्शित कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

काय आहे पोस्टर मध्ये

नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टर मध्ये अभिनेता अभिजित आमकर आणि प्रियदर्शनी इंदलकर पारंपरिक लग्नाच्या वेशभूषा परिधान केलेले दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर दिसणारा गोंधळ आणि प्रश्नार्थी चिन्ह लग्नात झालेला मोठा घोळ दर्शविताना दिसतोय. याशिवाय पोस्टरमध्ये दर्शविण्यात आलेले रेल्वे, बस, वळणदार रास्ता, राशीचक्र दिसत आहे. तर लग्नाअगोदर आणि लग्नानंतरही असे दोन शब्दप्रयोग बघायला मिळत आहे. या पोस्टरच्या माध्यमातून या चित्रपटात मनोरंजन अफाट असल्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा : साडे माडे तीन चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; 30 जानेवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

शिस्तबद्ध, संयमी अभिनेता

चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणारी प्रियदर्शनी ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली. आता ती लग्नाला शॉट या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तिला या चित्रपटाबाबत आणि सहकलाकाराबाबत विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, अभिजितसोबत काम करत असताना तिला खूप छान वाटले. तो शिस्तबद्ध, संयमी अभिनेता आहे. चित्रपटही आता हि नवीन जोडी प्रेक्षकांना कशी वाटली हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

या दिवशी होणार प्रदर्शित

लग्नाचा शॉट हा चित्रपट अक्षय गोरे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाला संगीत देण्याचे काम प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी केले आहे. या चित्रपटाचे निर्माते अक्षय गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी, सुरेश मगनलाल प्रजापती हे आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाईन डे मध्ये 6 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts