Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • शौर्य दिनानिमित्त अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन
Top News

शौर्य दिनानिमित्त अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन

Women beneficiaries happy after receiving New Year gift under Ladki Bahin Scheme

Shaurya Din Bhima Koregaon Tribute  : आज १ जानेवारी निमित्त भीमा कोरेगाव येथे २०८ वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या शौर्य दिनानिमित्त लाखो अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी भल्या पहाटेपासून भीमा कोरेगावात दाखल झालेत. या शौर्य दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी विजय स्तंभाला अभिवादन केलंय.

आज मी अभिवादन करण्यासाठी आलो आहे. प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. सर्व निधी या ठिकाणी देण्यात आला आहे. चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. दुपार नंतर गर्दी वाढेल, असे अजित पवार म्हणाले. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला पुष्पहार अर्पण करून पवारांनी अभिवादन केलं. त्या ऐतिहासिक लढाईतील शूरवीरांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली, असल्याचं ते म्हणाले.

हेही वाचा – अंतिम दिनी 2 हजार 122 नामनिर्देशन अर्ज दाखल; आज सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशनपत्रांची छाननी

प्रशासनाकडून तयार करण्यात आलेली तयारी पाहून प्रकाश आंबेडकर यांनी समाधान व्यक्त केले. जातीपाती, व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा होता, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. आज भीमा-कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भीमा-कोरेगाव विजयस्तंभासमोर उभा राहून, मी जातीय अत्याचाराविरुद्ध आमच्या पूर्वजांच्या असाधारण विजयाच्या स्मृतीला वंदन करतो आणि बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा माझा संकल्प पुन्हा दृढ करतो, असं ते म्हणाले.

हा विजय आत्मसन्मान आणि मानवी प्रतिष्ठेचा

१८१८ साली, केवळ ५०० सैनिकांच्या एका तुकडीने ज्यात ४९९ महार, १ मातंग, तसेच अलुतेदार, बलुतेदार सैनिकांचा समावेश होता. भीमा-कोरेगाव येथे त्यांनी पेशवाईला पराभूत केले. हा विजय केवळ तलवारींची लढाई नव्हती, तर तो आत्मसन्मान आणि मानवी प्रतिष्ठेसाठी होता. या विजयाने हे घोषित केले की, प्रतिष्ठा, समानता आणि आत्मसन्मान कायमचा चिरडला जाऊ शकत नाही, असं आंबेडकर म्हणाले.

अतुलनीय शौर्याची आठवण केवळ भूतकाळाची आठवण – आंबेडकर

आज आणि येणाऱ्या काळात जेव्हा तुम्ही विजयस्तंभाला भेट द्याल, तेव्हा त्या शूर सैनिकांचा सन्मान करा आणि त्यांच्या अतुलनीय शौर्याची आठवण केवळ भूतकाळाची आठवण म्हणून नव्हे, तर प्रतिकाराचे एक जिवंत प्रतीक म्हणून आणि एका स्वतंत्र आंबेडकरी राजकीय आकांक्षाचा पाया म्हणून पुढे घेऊन जा, जशी बाबासाहेब आंबेडकरांनी कल्पना केली होती. हाच आंबेडकरी लोकांसाठी खरा नवीन वर्षाचा दिवस आहे, असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी

जिल्हा परिषदेकडून 23 आरोग्य केंद्रे, 43 रुग्णवाहिका, 18 खासगी रुग्णालयांतील 286 खाटा आरक्षित, 155 प्रशिक्षित मनुष्यबळ, उपहारगृह व टँकरकरिता 33 तपासणी पथके, 80 घंटागाड्या, शुद्ध पाण्याच्या व्यवस्थेसाठी 150 टँकर्स, पाणी भरण्याच्या ठिकाणी 200 कर्मचारी नियुक्त, 2 हजार 800 शौचालये, 265 सफाई कामगार, 260 पर्यवेक्षण अधिकारी व कर्मचारी, 9 हिरकणी कक्ष आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. पुणे शहर पोलिस आयुक्तालयाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 1 महानिरीक्षक, 3 पोलिस उपमहानिरीक्षक, 20 पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, 8 राज्य राखीव पोलिस दल तुकड्या, 3 शीघ्र प्रतिसाद दल, 14 घातपातविरोधी पथके, 18 बीडीडीएस पथके, 650 होमगार्ड, 4 हजार 700 पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण सोहळ्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता फेस रिकग्नायजेशनकरिता 251 ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. 19 ठिकाणी वाहनतळाच्या माध्यमातून 20 हजार चारचाकी वाहनाची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts