• Home
  • राजकारण
  • नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणींना मिळाले मोठे गिफ्ट
Top News

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणींना मिळाले मोठे गिफ्ट

Women beneficiaries happy after receiving New Year gift under Ladki Bahin Scheme

Ladki Bahin Scheme New Year Gift : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वात मोठे गिफ्ट मिळाले आहे. यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये आनंदोत्सव बघायला मिळत असून आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे लक्ष जागून आहे.

महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची मोठी अपडेट समोर आली आहे. आता 2026 या वर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे. लड़फक्य बहिणींच्या खात्यात जमा होणारे 1500 रुपये दोन महिन्यांपासून जमा झाले नव्हते. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींच्या खात्यात हळूहळू हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असून काहींच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा झाला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हप्ता आल्याने लाडक्या बहिणी आनंदी आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा

राज्यातील सुमारे 2 कोटी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्यातील हप्ता आल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर उलटला परंतु कोणाच्याही खात्यात पैसे जमा झाले नव्हते. त्यानंतर तिन्ही महिन्यांचा एकूण हप्ता 4500 रुपये एकत्र जमा होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. परंतु हप्ता खात्यात कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आता काल पासून हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

कधी मिळणार डिसेंबर जानेवारीचा हप्ता

ज्या लाभार्थी महिलांनी EKYC प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. परंतु फक्त नोव्हेंबर महिन्यातील हप्ता जमा झाला असून डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. परंतु याबाबत अजूनही काही पुष्टी झाली नाही.

EKYC केलेल्या महिलांना मिळणार लाभ

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना EKYC बंधनकारक करण्यात आली आहे. परंतु EKYC करण्याची मुदत फक्त काल पर्यंत होती. म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या बोगस लाभार्थ्यांना वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून EKYC करणे बंधनकारक करण्यात आले होते. काल अखेरीस ही मुदत संपली. आणि आता ज्या महिलांनी EKYC पूर्ण केली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts