Breaking News :
  • Home
  • देश
  • तणाव शिगेला! अमेरिकेची इराणला मोठी धमकी, म्हणाले, आम्ही तुमच्यावर 20 पटीने…
Top News

तणाव शिगेला! अमेरिकेची इराणला मोठी धमकी, म्हणाले, आम्ही तुमच्यावर 20 पटीने…

trump khamnenei

US-Iran War | अमेरिका (US) आणि इराण (Iran) या देशांमधील युद्ध (War) चांगलेच पेटले आहे. दोन्ही देश एकमेकांवर आक्रमक होत हल्ले-प्रतिहल्ले करताना दिसत आहेत. यामध्ये आता चर्चा होत आहे ती होर्मुझची सामुद्रधुनीची. मागील काही दिवसांपूर्वी इराणने महत्त्वाचा होर्मुझ समुद्री मार्ग बंद केला होता. पण काही दिवसांनंतर हा मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला होता. अशातच आता पुन्हा एकदा इराणने आपला निर्णय बदलला असून हा मार्ग थेट बंद करण्यात आला आहे.

हेही वाचा – युद्ध थांबणार की भडकणार? संघर्षात नवा ट्विस्ट; इराणचा अमेरिकेला थेट इशारा, म्हणाले, युद्धाचा शेवट…

इराणने होर्मुझ मार्ग बंद केल्यामुळे कच्च्या तेलाची आयात-निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे. हा मार्ग बंद असल्यामुळे अनेक देशांचे टँकर समुद्रात अडकून पडले आहेत. त्यासोबत गॅसचा पुरवठा देखील बंद झाला आहे. यापार्श्वभूमीवर आता इराणने होर्मुझ मार्ग बंद केल्यामुळे अमेरिकेने इराणला मोठी धमकी दिली आहे.

अमेरिकेने इराणला काय धमकी दिली?

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने इराणला इशाला दिला होता. जर इराणने होर्मुझ मार्ग बंद केला तर आम्ही त्यांच्यावर घातक हल्ले करू, असा इशारा अमेरिकेने दिला होता. तर आताही अमेरिकेने इराणला मोठी धमकी दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथसोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, जर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाचा प्रवाह विस्कळीत करण्यासाठी काही हालचाल केली तर आम्ही इराणवर 20 पटीने हल्ले वाढवू, अशी थेट धमकी ट्रम्प यांनी इराणला दिली आहे. त्यामुळे आता हे युद्ध आणखी पेटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनलाही दिला गंभीर इशारा

पुढे ट्रम्प म्हणाले की, अमेरिका इराण देशाचं सर्वकाही नष्ट करेल. त्यांच्यावर आग, मृत्यूचा वर्षाव होईल. त्यामुळे इराणला एक राष्ट्र म्हणून पुनर्बांधणी करणे शक्य होणार नाही. ही अमेरिकेकडून चीन आणि त्या बाकीच्या सर्व देशांना भेट असेल, असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. यामध्ये त्यांनी चीन देशाचाही उल्लेख केल्याने संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आज डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध जवळपास संपले आहे, अशी घोषणा केली होती. तर त्यांच्या या वक्तव्यावर इराणने त्यांना प्रत्युत्तर दिले. हे युद्ध कधी संपवायचे हे अमेरिका ठरवणार नाही तर ते आम्ही ठरवू, असा थेट इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे. त्यामुळे आता हे युद्ध थांबत असतानाच अचानक इराणने नवीन ठिणगी टाकल्याने हे युद्ध पुन्हा पेटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts