ताज्या बातम्या

नर्तकी पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात; कोण आहे पूजा गायकवाड?

Pooja Gaikwad dancer arrested news

बीड : गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बरगे (वय 38 वर्षे ) यांच्या आत्महत्येनंतर बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात अडकलेल्या गोविंद यांनी तिच्या घरासमोर गाडीमध्ये स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील नर्तिका पूजा गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैशासाठी नर्तिका पूजा देविदास गायकवाड (२१, रा. सासुरे ता. बार्शी जि सोलापूर) हिने वारंवार तगादा लावल्याची तक्रार गोविंद यांचे मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण (रा. नंदापूर, जि. जालना) यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला असून तिला ताब्यात घेतले आहे. पूजा गायकवाड ही 21 वर्षांची असून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील रहिवासी आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी ती बार्शी तालुक्यातील थापडीतांडा येथील कला केंद्रात नृत्य सादर करू लागली.

 

सोशल मीडियावर पूजा गायकवाड म्हणतेय

गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर पूजा गायकवाडचा एक इंस्टाग्राम व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका ऑडिओवर अभिनय करताना दिसत आहे, ज्यात ‘मला या माणसाची विचित्र सवय लागली आहे, हा माझ्या आयुष्यातून गेला तर फार अवघड होईल’ असे बोलले आहे. तिच्या एका हातात 500 रुपयांची नोट आणि चार बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या दिसत आहेत.

 

भावाच्या नावावर 5 एकर शेती करण्याचा तगादा

ओळखीचा फायदा घेऊन प्रेमसंबध ठेऊन वेळोवेळी पैसे, सोने लुबाडले. दिलेल्या पैशातून मावशी व नातेवाईकांच्या नावावर प्लॉट जमीन घेतली. तरीही भावाच्या नावावर 5 एकर शेती करावी किंवा गेवराईतील नवीन घर माझ्या नावावर कर नाहीतर तुझ्यावर दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैशासाठी नर्तिका पूजा देविदास गायकवाड (21, रा. सासुरे ता. बार्शी, जि. सोलापूर) हिने वारंवार तगादा लावला. त्यामुळेच गोविंदने आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली.

 

अशी झाली होती ओळख

गेवराई (जि.बीड) येथील माजी उपसरपंच गोविंद बरगे यांना लोकनाट्य कला केंद्रात कला पाहण्याची आवड होती. दीड वर्षापूर्वी थापडीतांडा कला केंद्रामध्ये पूजा गायकवाड या नर्तकीसोबत त्याची ओळख झाली. हळूहळू तिचा प्रवास जसा पारगाव कला केंद्राकडे वळला तसे त्यांच्यातील मैत्रीचे संबंध प्रेमामध्ये गुंफल्याचे सांगण्यात येते. सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा1 मोबाइलदेखील नर्तकीला भेट दिला होता. अलिकडे तिने गोविंदशी संपर्क तोडल्यामुळे तो नैराश्यात होता. अनेकदा संपर्क साधण्याचा तो प्रयत्न करत असे. मात्र, पूजा प्रतिसाद देत नव्हती. गोविंद सासुरे येथे सोमवारी मध्यरात्री तिला भेटायला आला. मात्र, त्यांच्यातले वाद न मिटल्याने त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. मंगळवारी कारमध्ये स्टिअरिंगवर मृतावस्थेत आढळला.

 

नर्तकी पूजा गायकवाडची पोलीस तपास सुरु

नर्तकी पूजा गायकवाड ही सोशल मीडियावरही सक्रिय होती. इंस्टाग्रामवरून ती नियमित रील शेअर करत असे. विशेष म्हणजे, गोविंद यांनी आत्महत्या केलेल्या सोमवारी तिने तीन रील पोस्ट केल्या होत्या. मात्र त्यानंतर तिने एकही रील शेअर केलेली नाही. या योगायोगामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. गोविंद यांच्या आत्महत्येनंतर पूजावर गंभीर आरोप होत असले तरी तिच्या बाजूने कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. सध्या ती पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती असून, चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे तपशील उघड होण्याची शक्यता आहे.

 

या प्रेमसंबंधाच्या पार्श्वभूमीवर, आसपासच्या नातेवाईकांनी असा दावा केला आहे की गोविंद बर्गे यांना तिच्‍या गावात बोलावून ‘घातपात’ केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या सूक्ष्म तपशीलावर आधारित चौकशी सुरू केली आहे. या तपासादरम्यान, गाडीची बॅटरी पूर्णपणे उतरलेली होती आणि गोविंद यांच्याकडे बंदूक नव्हती; त्यामुळे बंदूक कुठून आली याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेने स्थानिक राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ निर्माण केली आहे. आत्महत्या आहे की हत्या, या दोन्ही शक्यतेचा विचार पोलिस तपासात घेतला जात आहे. शिवाय, पूजा गायकवाडवर काही जबाबदाऱ्या आहेत का, किंवा कोणत्या प्रकारचा दबाव होता का, या बाबतीतही तपास सुरू आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts