• Home
  • बिजनेस
  • युद्ध थांबताच सोन्याची मोठी झेप! एका झटक्यात इतक्या रुपयांनी झाली वाढ; जाणून घ्या आजचे ताजे दर
Top News

युद्ध थांबताच सोन्याची मोठी झेप! एका झटक्यात इतक्या रुपयांनी झाली वाढ; जाणून घ्या आजचे ताजे दर

gold silver

Gold-Silver Rates Today | 40 दिवसांच्या भीषण युद्धानंतर अमेरिका (US) आणि इराण (Iran) या देशांनी अखेर युद्धविराम जाहीर केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची मोठी घोषणा केली आहे. युद्धविरामाच्या या घोषणेनंतर सोनं आणि चांदीच्या दरात (Gold And Silver Rates) मोठी वाढ झाली आहे. एकिकडे कच्चा तेलाच्या किमतींमध्ये घट झाली आहे तर दुसरीकडे मात्र सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.

हेही वाचा – युद्धबंदीनंतर मोठा दिलासा? कच्च्या तेलाच्या दरात घसरण, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

किती रूपयांनी झाली सोनं-चांदीच्या दरात वाढ?

सोनं-चांदीच्या दराने मोठी झेप घेतली आहे. आज 24 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याच्या दरात 3,980 रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे तुम्हाला सोन खरेदी करताना 1,53,820 रूपये मोजावे लागणार आहेत. तर 24 कॅरेटच्या 10 तोळा सोन्याच्या दरात 39,800 रूपयांची मोठी वाढ झाली आहे. सोबतच 10,000 रूपयांनी एक किलो चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

22 कॅरेज सोन्याच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 22 कॅरेटचं 1 तोळा सोनं हे 3,650 रूपयांनी महाग झाले आहे. तर 22 कॅरेटचं 10 तोळा सोनं हे 36,500 रूपयांची महाग झाले आहे. त्यामुळे तुम्हाला एक तोळा सोनं खरेदी करताना 1,41,000 रूपये मोजावे लागणार आहेत. 24, 22 कॅरेटसोबतच 18 कॅरेटच्या सोन्यातही मोठी वाढ झाली आहे.

18 कॅरेटचा 1 तोळा सोन्याच्या दरात आज 2,990 रूपयांची वाढ झाली आहे. तर 18 कॅरेटच्या 10 तोळा सोन्याच्या दरात 29,900 रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे तुम्हाला एक तोळा सोनं खरेदी करताना 1,15,370 रूपये खर्च करावे लागणार आहेत. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही विक्रमी वाढ झाली आहे. 1 ग्रॅम चांदीच्या दरात 10 रूपयांची वाढ झाली आहे. तर 1 किलो चांदीच्या दरात 10,000 रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही चांदी खरेदी करणार असाल तर तुम्हाला एक ग्रॅमसाठी 260 रूपये आणि एक किलो चांदीसाठी 2,60,000 रूपये मोजावे लागणार आहेत. सोनं-चांदीच्या दरातील या विक्रमी वाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला असून ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts