• Home
  • राजकारण
  • भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट, कोर्टाचे तरुणीला आईकडे सुपूर्द करण्याचे आदेश
Top News

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट, कोर्टाचे तरुणीला आईकडे सुपूर्द करण्याचे आदेश

Twist in the Bhigwan case

The Bhigawan affair : कोर्टात तरुणीने आई आणि मामाकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. तरुणीच्या इच्छेनुसार कोर्टाने तरुणीला आईकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले. भिगवण परिसरातील एक तरुणी मुस्लिम समाजातील तरुणासोबत 17 फेब्रुवारीला पळून गेल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर ती 20 फेब्रुवारी रोजी बारामती पोलिस ठाण्यात तरुणासह ती हजर झाली होती. यावेळी तिने आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर तरुणीला सुधारगृहात ठेवण्यात आले. सुधारगृहातील मुक्कामानंतर मुलीने आज 26 फेब्रुवारी रोजी कोर्टात जबाब नोंदवला आहे. या जबाबामध्ये तिने आईकडे आणि मामाकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हेही वाचा – ‘सुनेत्रा पर्व’ सुरू, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार विराजमान

भिगवण परिसरात एका २१ वर्षीय तरुणी लग्नाची खरेदी करून आई आणि भावासोबत घरी परतत असताना तिचे अपहरण झाल्याचा दावा करण्यात आला. भरदिवसा रस्त्यावरच दोन तरुणांनी तिच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तरुणीला जबरदस्तीने नेल्याचा आरोप होता. या घटनेनंतर कुटुंबीयांनी भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. यामुळे स्थानिक स्तरावर तीव्र आक्रोश उमटला, हिंदू संघटना आणि राजकीय नेत्यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या. काही ठिकाणी रस्ता रोको आणि बंदचे आवाहनही करण्यात आले. मात्र, या प्रकरणात धक्कादायक वळण आले.

स्वतःच्या मर्जीने संबंधित तरुणासोबत गेले

सोशल मीडियावर तरुणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तरुणीने स्पष्टपणे सांगितले की, अपहरण झाले नाही. मी स्वतःच्या मर्जीने संबंधित तरुणासोबत निघून आले. आमचे प्रेमसंबंध आहेत. कोणतीही जबरदस्ती किंवा दबाव नव्हता. या व्हिडिओनंतर तरुणी आणि तिच्यासोबत असलेला झहीर शेख आणि अझहर शेख असे नाव समोर आले. दोघेही स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. तरुणीने पोलिसांसमोर प्रत शपथपत्र सादर करूनही आपल्या विधानाची पुष्टी केली आणि अपहरणाचा आरोप फेटाळला. आता सुधारगृहात राहिल्यानंतर तरुणीने आईकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तरुणीने आई आन् मामाकडे जाण्याची इच्छा केली व्यक्त

गेल्या काही दिवसांपासून भिगवण येथील एका तरुणीची राज्यात चर्चा सुरु आहे. लग्नाच्या दोन दिवस आधी तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांनंतर तरुणी मुस्लिम मुलासोबत पळून गेल्याची माहिती समोर आली होती. आता भिगवण प्रकरणात मोठा ट्विट पाहायला मिळत आहे. मला आईकडे जायचं आहे असे म्हणत तरुणीने कोर्टात दिलेला जबाब बदलला आहे. याआधी तिने मुलासोबत रहायाचे आहे असा जबाब नोंदवला होता. इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर तरुणीला व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे हजर करण्यात आले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts