• Home
  • ताज्या बातम्या
  • कॅफे-स्टाईल सकाळी नाश्ता हवाय? घरच्या घरी आजच बनवा चविष्ट फ्रेंच टोस्ट, सोपी आहे रेसिपी
ताज्या बातम्या

कॅफे-स्टाईल सकाळी नाश्ता हवाय? घरच्या घरी आजच बनवा चविष्ट फ्रेंच टोस्ट, सोपी आहे रेसिपी

French Toast Recipe

French Toast Recipe: आजच्या धावपळीच्या जीवनात झटपट आणि चविष्ट नाश्ता हवा असतो. कॅफे- स्टाईल फ्रेंच टोस्ट हा घरच्या घरी कमी वेळात बनणारा परफेस्ट पर्याय आहे तिखट तयार होणारा हा नाश्ता सर्वानाच आवडतो. तर वाट कसली पाहता लगेच नोट करा रेसिपी

आजच्या धावपळीच्या जीवनात झटपट आणि चविष्ट नाश्ता मिळणं खूप महत्वाचं आहे. अशावेळी कॅफे-स्टाईल फ्रेंच टोस्ट (french Toast Recipe) हा एक परफेस्ट पर्याय ठरतो. कमी वेळात, अगदी घरच्या घरी उपलब्ध साहित्य वापरून तुम्ही हा स्वादिष्ट नाश्ता तयार करू शकता. मसालेदार बनवता येणारा हा फ्रेंच टोस्ट मुलांपासून मोठ्यांपर्यं सर्वांचा आवडता आहे. चला तर मग, आजच सोपी रेसिपी पाहू आणि घरच्या घरी कॅफे- स्टाईल नाश्त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता.

हेही वाचा: झटपट होणारा ओट्सचा ‘हा’ नाश्ता कधी ट्राय केलाय का? लगेच लिहून घ्या रेसिपी

तिखट फ्रेंच टोस्ट

साहित्य

ब्रेड स्लाइस – 4
अंडी – 2
दूध – अर्धा कप
कांदा – 1 (बारीक चिरलेला)
हिरवी मिरची – 1 (बारीक चिरलेली)
कोथिंबीर – 2 टेबलस्पून
मीठ – चवीनुसार
काळी मिरी पूड – अर्धा टीस्पून

कृती

एका भांड्यात अंडी, दूध, साखर आणि काळी मिरी पूड एकत्र करा.

त्यात कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून चांगले मिसळा.

ब्रेडचे तुकडे या मिश्रणाने पूर्णपणे माखून घ्या.

एका तव्यावर थोडे तेल गरम करून ब्रेड दोन्ही बाजूंनी कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. अशा प्रकारे पटकन तयार केले जाते आणि नाश्त्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts