• Home
  • महाराष्ट्र
  • धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; एकजण जागीच ठार तर एक गंभीर
गुन्हा

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; एकजण जागीच ठार तर एक गंभीर

Scene of a serious road accident on the Dhule–Solapur Highway showing damaged vehicles, with reports of one person dead and another critically injured

Dhule Solapur highway accident : आजकाल अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला. या अपघाता एकाच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याती धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील रजापूर शिवारात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून परत जात असलेल्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोराची धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार ठार तर त्यांच्यासोबत असलेला एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मौलाना जाकीर मंजुर शेख मृतकाचे तर शहारुख दिलावर शेख असे जखमीचे नाव आहे.

हे ही वाचा :महिला डॉक्टराच्या हातीवरील अक्षर कोणाच? फाॅरेन्सिक रिपोर्ट आले; फडणवीसांची सभागृहात माहिती

कसा झाला अपघात

मौलाना जाकीर मंजुर शेख , शहारुख दिलावर शेख हे दोघे सख्ये चुलत भाऊ आहे. हे रजापूर शिवारातील अभिजित पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरून जात होते. ते राजमार्ग प्राधिकरणाने अनाधिकृतपणे दुभाजक तोडून तयार केलेल्या चौफुली कडे जात असतांना आडूळकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, यामुळे दुचाकी आणि दुचाकीस्वार आणि मागे बसलेला व्यक्ती तब्बल पन्नास ते शंभर फूटांपर्यंत फरफटत गेला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार मौलाना जाकीर शेख जागीच ठार झाले तर त्यांचा सख्खा चुलत भाऊ शहारूख शेख गंभीर जखमी झाले होते. या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

चंद्रपूर चेक आष्टा फाट्याजवळ टँकरची ऑटोला धडक; दोन महिला गंभीर जखमी

चेक आष्टा फाट्याजवळ देखील मंगळवारी 9 डिसेंबरला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास टँकरने ऑटोला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. जखमींमध्ये मंगला कन्नाके आणि रुसा आत्राम राहणार भटारी यांचा समावेश आहे. ही घटना चेक आष्टा फाट्याजवळ घडली. मंगला कन्नाके आणि रुसा आत्राम या महिला पोंभुर्णा येथील आंदोलन आटोपून भटारीकडे जात होत्या. याच दरम्यान, भरधाव टँकरने त्यांच्या ऑटोला धडक दिली. या धडकेत दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts