• Home
  • लाईफस्टाईल
  • हेल्दी समजून रात्री ब्लॅक कॉफी पिताय? तर ही सवय पडू शकते महागात, जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम
ताज्या बातम्या

हेल्दी समजून रात्री ब्लॅक कॉफी पिताय? तर ही सवय पडू शकते महागात, जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

black coffee

Black Coffee Disadvantages | आजकाल बरेचजण असे आहेत ज्यांचा कॉफी (Coffee) पिल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. काही कॉफीप्रेमी असेही असतात जे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कितीतरी वेळा कॉफी पित असतात. यामध्ये काही लोक तर असे असतात ज्यांना सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्लॅक कॉफीची (Black Coffee) गरज असते. पण, तुम्हाला माहिती आहे का की, रात्रीच्या वेळी ब्लॅक कॉफी पिणे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. रात्री ब्लॅक कॉफी पिल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होताना दिसतात. चला तर मग आता आपण रात्रीच्या वेळी ब्लॅक कॉफी पिल्याने कोणते दुष्परिणाम होतात याबाबत जाणून घेऊया.

हेही वाचा – पार्लरला न जाता मिळवा फ्रेश अन् ग्लोइंग त्वचा; घरच्या घरी करा नैसर्गिक ब्लीच

ब्लॅक कॉफी पिल्याने कोणते दुष्परिणाम होतात?

पचनाच्या समस्या – ब्लॅक कॉफी ही आम्लधर्मी असते. त्यामुळे रिकाम्या पोटी किंवा रात्रीच्या वेळी ती प्यायल्याने पित्त होतं किंवा छातीत जळजळ होऊ शकते. यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी ब्लॅक कॉफी पिणे टाळावे आणि हेल्दी असा आहार घ्यावा.

झोप लागण्यास त्रास – ब्लॅक कॉफीमधील कॅफीन तुमच्या मेंदूतील ‘अ‍ॅडेनोसिन’ नावाच्या रसायनाला अवरोधित करते, ज्यामुळे झोप लागत नाही. बरेच लोक रात्रीच्या वेळी ब्लॅक कॉफी पितात, ज्यामुळे त्यांना झोप लागायला तासनतास लागतात किंवा वारंवार जाग येते आणि त्यांची झोप व्यवस्थित होत नाही. तसेच जरी कॉफी पिल्यानंतर तुम्हाला झोप लागली तरी कॅफीन तुमच्या गाढ झोपेची गुणवत्ता कमी करते ज्यामुळे सकाळी तुम्हाला थकवा जाणवतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी ब्लॅक कॉफीचे सेवन करू नये.

चिंता आणि अस्वस्थता – रात्रीची शांत वेळी बऱ्याच लोकांना दिवसभराचं टेन्शन आणि अतिविचार त्रास देत असतात. अशातच कॉफीचे सेवन केले तर त्यातील कॅफीन हृदयाचे ठोके वाढू शकतात ज्यामुळे अस्वस्थता आणि बेचैनी निर्माण होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी ब्लॅक कॉफी पिऊ नये. त्याजागी तुम्ही दूध किंवा फळांचा ज्यूस पिऊ शकता. यामुळे तुमचे शरीर निरोगी राहते आणि शांत झोप लागण्यासही मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts