Breaking News :
  • Home
  • देश
  • फिलीपिन्सच्या दक्षिण किनाऱ्यावर भूकंपाचा जोरदार धक्का; जीवितहानी किंवा नुकसानीचं कोणतंही वृत्त नाही
ताज्या बातम्या

फिलीपिन्सच्या दक्षिण किनाऱ्यावर भूकंपाचा जोरदार धक्का; जीवितहानी किंवा नुकसानीचं कोणतंही वृत्त नाही

Earthquakes In Rajkot

Earthquake in Philippines : अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण (USGS) नुसार, आज फिलीपिन्सच्या दक्षिण किनाऱ्यावर 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. सुरुवातीला भूकंपाची तीव्रता 6.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती, परंतु नंतर ती 6.4 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. भूकंप झाला तेव्हा लोक घरे सोडून मोकळ्या मैदानात गेले. भूकंपाचं केंद्र मिंडानाओ बेटावरील सॅंटियागो शहरापासून 27 किलोमीटर पूर्वेला होतं. भूकंप 58.5 किलोमीटर खोलीवर झाला. मात्र, अद्याप त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.

नुकसानीचं कोणतंही वृत्त नाही :

पूर्व प्रांत दावाओ ओरिएंटलमधील मदत कर्मचारी नॅश परागास यांनी सांगितलं की, जीवितहानी किंवा नुकसानीचं कोणतंही वृत्त नाही. “मला भूकंपाचा धक्का जाणवला. मी काही गाड्या हादरताना पाहिल्या, परंतु तो खूप कमी वेळाचा होता, कदाचित पाच सेकंदांचा.” ऑक्टोबरच्या सुरुवातीला, पूर्व मिंडानाओमध्ये 7.4 आणि 6.7 रिश्टर स्केलचे दोन भूकंप झाले होते, ज्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी, 6.9 रिश्टर स्केलच्या भूकंपात 76 लोकांचा मृत्यू झाला होता. सरकारी आकडेवारीनुसार, मध्य फिलीपिन्समधील सेबू इथं 72,000 घरांचं नुकसान झालं आहे. फिलीपिन्समध्ये भूकंप होणे सामान्य आहे. हा देश पॅसिफिक महासागराच्या रिंग ऑफ फायरमध्ये आहे, हा प्रदेश जपानपासून आग्नेय आशिया आणि संपूर्ण पॅसिफिक महासागरापर्यंत पसरलेला आहे, जिथं भूकंप वारंवार होतात.

भूकंप कसे होतात? :

भूकंप म्हणजे पृथ्वीची हालचाल. जेव्हा जमीन अचानक हादरते तेव्हा त्याला भूकंप म्हणतात. पृथ्वीच्या वरच्या थराला लिथोस्फीअर म्हणतात. या थरात, खडक वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांवर आदळतात किंवा सरकतात. जेव्हा हा दाब वाढतो आणि खडक ते सहन करु शकत नाहीत तेव्हा ते तुटतात किंवा हिंसकपणे सरकतात. यामुळं पृथ्वी हादरते, परिणामी भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता बदलू शकते. कधीकधी हादरे सौम्य असतात, काही सेकंद टिकतात. कधीकधी भूकंप खूप तीव्र असतो, ज्यामुळं लोक पडतात आणि इमारती हलतात. संपूर्ण शहराचं मोठं नुकसान होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts