Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • पुणे-पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची रणनिती ठरली; उमेदवारांसोबत संवाद
Pune

पुणे-पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची रणनिती ठरली; उमेदवारांसोबत संवाद

Ajit Pawar interacts with candidates ahead of Pune Pimpri-Chinchwad municipal elections

Ajit Pawar municipal election strategy : आगामी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी उमेदवारांशी सविस्तर चर्चा करत भाजपला रोखण्यासाठी ठोस आणि आक्रमक रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.

पुण्यातील शिवाजीनगर येथे असलेल्या तरवडे क्लार्क्स इन येथे ही बैठक पार पडली. या बैठकीसाठी अजित पवारांसह पुण्यातील राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रत्येक उमेदवारासोबत संवाद साधला. आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारातील अचूक नियोजनावर भर दिला.

हे ही वाचा : काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावर चाकूहल्ला:अकोल्यात उपचारादरम्यान मृत्यू

या बैठकीदरम्यान संघटनात्मक मजबुती, निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचारातील अचूक नियोजनावर भर देण्यात आला. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपविरोधात थेट राष्ट्रवादीची लढाई असल्याने अजित पवारांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. तर मागील काही वर्षात तुम्ही काय काम केले, ते लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन लोकांसोबत संवाद साधा, अशा सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारांना दिल्या आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वतंत्र नगरसेवकांशीही संवाद साधत व्यापक व्यूहरचना आखण्यात येत असल्याचे संकेत या बैठकीतून मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts